शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

सामाजिक वनीकरणतर्फे राज्यस्तरीय विविध स्पर्धा

By admin | Published: September 21, 2015 10:57 PM

पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम : प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध, चित्रकला, ३0 सप्टेंबरपर्यंत मुदत

ओरोस : सामाजिक वनीकरण महासंचालनालय महाराष्ट्र, पुणेतर्फे माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी चित्रकला तसेच राज्यपातळीवर सर्वांसाठी खुली छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील निबंध व चित्रकला स्पर्धेसाठी प्रत्येक जिल्ह्याचे प्रथम व व्दितीय क्रमांकांच्या प्रवेशिकांचे राज्यस्तरावर परीक्षण होणार असून, त्यातून राज्यस्तरीय विजेते निश्चित करण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी प्राथमिक गट - चौथी ते सातवी, माध्यमिक गट - आठवी, दहावी आणि महाविद्यालयीन गट - ११ वी व पुढे असे गट आहेत. महाविद्यालयीन गटासाठी ‘बदललेल्या ऋतुचक्राचे परिणाम’ आकार ५६ से. मी. बाय २५ से. मी. साहित्य वॉटर कलर, पोस्टर कलर, आॅईल कलर. वक्तृत्व स्पर्धा माध्यमिक गटासाठी विषय : ‘पर्यावरण स्नेही जीवन शैली’, वेळ : दहा मिनिटे. महाविद्यालयीन गटासाठी विषय : ‘जल प्रदूषणाची समस्या व त्यामवरील उपाय’ वेळ : १० मिनिटे. राज्यस्तरीय खुली छायाचित्र विषय : ‘हरित टेकडी’ आकार २५ से. मी. बाय २० से. मी., महाविद्यालयीन गटासाठी (इ. अकरावी पुढे). जिल्हास्तर स्पर्धेचे नाव, निबंध, चित्रकला, वक्तृत्व प्रथम ५०० रुपये, द्वितीय ३०० रुपये, तृतीय १०० रुपये. राज्यस्तत्र निबंध व चित्रकला प्रथम १००० रुपये, द्वितीय ६०० रुपये, तृतीय ४०० रुपयांचे पारितोषिक ठेवले आहे.माध्यमिक गटासाठी (आठवी, दहावी) जिल्हास्तर स्पर्धेचे नाव निबंध, चित्रकला, वक्तृत्व प्रथम ५०० रुपये, द्वितीय ३०० रुपये, तृतीय २०० रुपये. राज्यस्तर निबंध व चित्रकला प्रथम ७०० रुपये, द्वितीय ५०० रुपये, तृतीय ३०० रुपये. प्राथमिक गटासाठी विषय चित्रकला जिल्हास्तर प्रथम १५० रुपये, द्वितीय १00 रुपये, तृतीय ७५ रुपयांचे पारितोषिक ठेवले आहे.राज्यस्तर स्पर्धेचे नाव निबंध, चित्रकला, वक्तृत्व प्रथम ४00 रुपये, द्वितीय ३०० रुपये, तृतीय २०० रुपये सर्वांसाठी खुल्या गटासाठी राज्यस्तर विषय खुली छायाचित्र स्पर्धा जिल्हास्तरीय स्पर्धेचे नाव निबंध, चित्रकला, वक्तृत्व प्रथम ३००० रुपये, द्वितीय २००० रुपये, तृतीय १००० रुपये राज्यस्तरीय खुल्या छायाचित्र (फोटोग्राफी स्पर्धा) स्पर्धेसाठीच्या छायाचित्रास सुयोग्य शीर्षक देणे आवश्यक आहे. याशिवाय प्रत्येकी ५०० रुपयांची पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देणार आहेत. शाळा, विद्यालये आणि महाविद्यालय प्रमुखांनी निबंध, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करून प्रत्येकी प्रथम तीन क्रमांकाची चित्रे व निबंध शिफारशीसह संबंधित जिल्ह्याचे उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग यांच्याकडे ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत पाठवायचे आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील निबंध व चित्रकला स्पर्धेच्या प्रत्येक गटातील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या प्रवेशिका उपसंचालकांनी दिनांक १५ सप्टेंबर २0१५ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन उपसंचालक सामाजिक वनीकरण विभागाने केले आहे. प्राथमिक गटासाठी फक्त चित्रकला स्पर्धा, तर माध्यामिक व महाविद्यालयीन गटांसाठी निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. निबंध स्पर्धेसाठी माध्यमिक गटास ‘स्वच्छता अभियानात माझी भूमिका’ हा विषय देण्यात आला असून शब्द मर्यादा ६०० शब्दांची आहे. महाविद्यालयीन गटासाठी ‘जागतिक तापमान वाढ व हवामानातील बदल’ हा विषय असून, १०० शब्दांत निबंध व चित्रकला स्पर्धेसाठी प्राथमिक गटास ‘मी पाहिलेला जंगलातील प्राणी’ या विषयावर ३५ से. मी. बाय २८ से. मी. चित्र काढायचे आहे. माध्यमिक गटासाठी ‘माझी हरित शाळा’ हा विषय आहे. आकार ३५ से. मी. बाय २८ से. मी. साहित्य वॉटर, कलर पेन्सिल, स्केच पेन वापरायचे आहे.