कणकवली : शहरातील कनकनगर येथील सिद्धिविनायक अपार्टमेंटमधील युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष आतिष उर्फ भाई रावजी जेठे यांच्या कारसह दुचाकीची तोडफोड झाल्याची घटना सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.जेठे यांनी रविवारी रात्री झोपण्यापूर्वी गाड्या इमारतीखाली उभ्या केल्या होत्या. मात्र, सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान मॉर्निंग वॉकला बाहेर पडताना जेठे यांना कार व दुचाकीची तोडफोड झाल्याचे निदर्शनास आले. कारची दर्शनी काच फोडली तर,मागील व पुढील वायफरची मोडतोड केली. तसेच दुचाकीची संपूर्ण सीट फाडून नुकसान केले. दोन्ही गाड्यांचे मिळून ५० हजारांचे नुकसान झाले आहे.जेठे यांनी गाड्या फोडलेल्या एका संशयिताचे नाव आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. राजकीय सूडापोटी गाड्या फोडण्यात आल्याचा जेठे यांनी संशय व्यक्त केला आहे. याबाबत आतिष जेठे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जेठे यांच्या तक्रारीनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
कणकवलीत गाड्यांची तोडफोड, पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 6:16 PM
कणकवली शहरातील कनकनगर येथील सिद्धिविनायक अपार्टमेंटमधील युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष आतिष उर्फ भाई रावजी जेठे यांच्या कारसह दुचाकीची तोडफोड झाल्याची घटना सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
ठळक मुद्देकणकवलीत गाड्यांची तोडफोडपोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल