शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

वेंगुर्लेत चुरस रंगणार

By admin | Published: October 30, 2016 11:48 PM

नगरपरिषदेची निवडणूक : उमेदवारांची संख्या वाढली; १७ जागांसाठी ७५ उमेदवार

 प्रथमेश गुरव ल्ल वेंगुर्ले वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांची भाऊगर्दी झाली. १७ जागांसाठी ७५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून येत्या २ नोव्हेंबरला होणाऱ्या उमेदवारांच्या छाननीत किती उमेदवारांचे अर्ज अवैध ठरतात हे लवकरच समजणार आहे. यावेळी सर्वच पक्षांनी उमेदवारीमध्ये बदल करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. पक्षांनी दिलेल्या या संधीचा मतदार किती उपयोग करुन घेतात हे मात्र निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गेले काही दिवस सुयोग्य उमेदवार देण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले होते. शिवसेना-भाजप युती होईल, असे सर्वांनाच वाटले होते. मात्र, ऐनवेळी युती न झाल्याने उमेदवारीसाठी तारांबळ उडाली. परिणामी शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचे ठरवित नवीन चेहऱ्यांना संधी देत सतराही जागांवर आपले उमेदवार उभे केले. काँग्रेसनेही बऱ्यापैकी नव्यांनाच संधी देत १५ जागांवर उमेदवार दिले. तर मागच्या निवडणुकीवेळी निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव उमेदवार दाजी परब यांना यावेळी प्रशासनामार्फत देण्यात येणारे अधिकृत फॉर्म नसल्याने माघार घ्यावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन नवीन चेहऱ्यांना संधी देत ७ उमेदवार उभे केले. यात पूर्वी काँग्रेसमधून लढलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे. अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांमध्ये जुन्या अनभुवी उमेदवारांची संख्या जास्त आहे. निवडणुकीची तारीख जाहीर होताच इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त दिसत होती. संबंधित पक्षांकडून आपल्यालाच उमेदवारी मिळणार, या अनुषंगाने मतदारांच्या गाठीभेटी घेणे, चर्चा आदी कार्यक्रम सुरु केले होते. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा घेतलेला निर्णय काहींच्या पथ्यावर पडला. पक्षाच्या या निर्णयामुळे नाराज इच्छुक उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तर आधीच पक्षाकडून उमेदवारी आपल्याला मिळणार नसल्याची कुणकुण लागलेल्या उमेदवारांनी पक्षबदल करीत संबंधित पक्षाची उमेदवारी स्वीकारली. पक्षनिष्ठा कायम ठेवून पक्षाकडून उमेदवारी अर्ज न मिळालेल्या उमेदवारांवर ‘हेचि फळ काय मम तपासी’ असे म्हणण्याची वेळ आली. एकंदरीत पक्ष बदलून, अपक्ष राहून नाराज उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली. पण हे उमेदवार आपल्या मताशी ठाम राहतात की प्रलोभनांना बळी पडून उमेदवारी अर्ज मागे घेतात, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार हे बहुतांशी नवीन असल्याने मतदारांनाही उमेदवार निवडणे कष्टाचे पडणार आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकींमध्ये आपलेच शेजारी, मित्रमंडळी, नातेवाईक, समाजबांधव उभे रहात असल्याने पक्षांनाही याचा फायदा होणार आहे. मात्र, हा फायदा कोणता पक्ष करून घेतो, याबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज भरल्यामुळे प्रचारयंत्रणाही जोरदार सुरु होणार आहे. अधिकृत पक्षांचे उमेदवार प्रचारासाठी आपल्या पक्षाच्या चिन्हांचा वापर करणार आहेत. तर अपक्ष उमेदवार चिन्ह मिळेपर्यंत तूर्तास आपले नावच लक्षात ठेवण्यास सांगणार आहेत.