शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

वेंगुर्लेत तालुकास्तरीय साहित्य संमेलन

By admin | Published: January 23, 2015 9:10 PM

१४, १५ फेब्रुवारी : संमेलन यशस्वी करण्यासाठी नियोजन बैठकीत निर्णय

वेंगुर्ले : सातेरी प्रासादिक संघ संचलित आनंदयात्री वाङ्मय मंडळाने वेंगुर्ले तालुकास्तरीय साहित्य संमेलनाचे १४ व १५ फेब्रुवारी रोजी आयोजन येथील साई मंगल कार्यालयात केले आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी नियोजन बैठकीत एकमुखाने निर्णय घेण्यात आला. हे साहित्य संमेलन कोकण मराठी साहित्य परिषद, वेंगुर्ले शाखा, शिक्षक वाङ्मय चर्चा मंडळ, किरात, माध्यमिक मराठी शिक्षक संघ, वेंगुर्ले या सहयोगी संस्थांच्या सहकार्याने होणार आहे.वेंगुर्ले सातेरी मंदिर येथील जनसेवा हॉलमध्ये कार्यक्रमाच्या संयोजिका तथा लेखिका वृंदा कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा. आनंद बांदेकर, प्रा. सचिन परूळकर, दाभोली हायस्कूलचे दादा सोकटे, वेंगुर्ले हायस्कूलचे पी. एन. सामंत, अमर तांडेल, नगरसेविका सुषमा प्रभूखानोलकर, मठ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील जाधव, खर्डेकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी प्रतिनिधी हर्षदा तोरसकर, गुरुदास तिरोडकर, महेश राऊळ, रफिक शेख, प्रशिक्षक सागर परब, रवींद्र वारंग, चैतन्य दळवी, महेंद्र घाडी, सुरेश कौलगेकर, सचिन वराडकर, आदी उपस्थित होते. या संमेलनाची सुरुवात ग्र्रंथदिंडीने करून, या ग्रंथदिंंडीत वेगवेगळ्या साहित्याच्या कल्पना मांडण्यात येणार आहेत. या दिंडीला शोभा यात्रेचे स्वरूप दिले जाणार आहे. संमेलनामध्ये साहित्यिकांच्या रांगोळी तसेच विविध स्पर्धा घेण्याबाबत नियोजन करण्यात आले. यावेळी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. (प्र्रतिनिधी) लोगो पाठविण्याचे आवाहन--वेंगुर्लेत प्रथमच तालुकास्तरीय साहित्य संमेलन होत असल्याने या संमेलनाचा लोगो वेंगुर्लेतील निसर्ग, उत्पादने, संस्कृती व इतिहास तसेच साहित्याचे दर्शन घडविणारा, असा सर्वसमावेशक बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. लोगो बनवून २६ जानेवारीपर्यंत लोगो पाठवायचा आहे. या स्पर्धेतील विजेत्यास सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देण्यात येईल. इच्छुकांनी सुरेश कौलगेकर, बी. के . रोड, वेंगुर्ले या पत्त्यावर लोगो पाठवावा.साहित्यिक ओळख जपण्याचा प्रयत्न--वेंगुर्लेत तालुकास्तरीय साहित्य संमेलनात उदयोन्मुख लेखक व कवी यांना व्यासपीठ मिळणार आहे. वेंगुर्ले तालुक्याला संस्कृती, ऐतिहासिक तसेच साहित्याचा मोठा वारसा आहे.वि. स. खांडेकर, जयवंत दळवी, मंगेश पाडगावकर यासारखे अनेक लेखक व साहित्यिक तसेच कवी या तालुक्यातीलच असल्याने त्यांची ओळख या साहित्य संमेलनातून वाचक व रसिकांना होण्याचा या संमेलनातून प्रयत्न केला जाणार आहे. या सर्व साहित्यिकांची एकत्रित माहिती संंकलित करून त्याचे प्रदर्शन या संमेलनात मांडले जाणार आहे.