शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

सिंधुदुर्ग : नियोजन सभेत 'या' विषयावरून राणे-पारकर-धुरी यांच्यात शाब्दिक चकमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 6:16 PM

केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी कधी आक्रमक पणे तर कधी उलट सुलट चिमटे काढत सभागृहातील वातावरण खेळते ठेवले. मात्र यावेळी प्रतिभा डेअरी वरून संदेश पारकर मंत्री राणे यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले

ओरोस : बर्‍याच कालावधीनंतर होणारी नियोजन सभा वादळी होणार म्हणून सर्वच प्रशासन धीर गंभीर होते. मात्र प्रत्यक्ष सभेत उलटेच घडल्याने सर्वानीच सुटकेचा निश्वास सोडला. केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी कधी आक्रमक पणे तर कधी उलट सुलट चिमटे काढत सभागृहातील वातावरण खेळते ठेवले. मात्र यावेळी प्रतिभा डेअरी वरून संदेश पारकर मंत्री राणे यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले. तर 'शिवसेना प्रवेशासाठी पालकमंत्री निधी देतात का' या वृत्तपत्राच्या कात्रणावरून केंद्रीय मंत्री राणे यांनी विचारलेल्या प्रश्नावरून आमदार नितेश राणे व बाबूराव धुरी शाब्दिक चकमक झाली.सिंधुदुर्ग नियोजन सभा बऱ्याच कालावधीनंतर मंगळवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा परीषद निधी मागे गेल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. तर प्रतिभा डेअरी कडून शेतकऱ्याचे पैसे थकवण्यात आले यावर सदस्य संदेश पारकर व मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. अपंग कल्याण निधी वरून ही अकुश जाधव यांनी पालकमंत्री सामंत यांना कोडीत पकडण्याचा प्रयत्न केला.यावेळी श्वेता कोरगावकर यांनी तालुका क्रीडांगण हे बांदा ऐवजी सावंतवाडीत  नेण्यात आले त्यावरून सभागृहाचे लक्ष वेधत ते पुन्हा बांदा येथे आणा अशी मागणी केली. पण त्यावर पालकमंत्री सामंत यांनी शासन अध्यादेश हा तालुकास्तरीय आहे मग जागा जर सावंतवाडीत दिली असेल तर बांदा येथे देता येणार नाही असे सांगितले. त्यावर बांदा गावावर अन्याय असल्याचे आमदार राणे म्हणाले.सभा खेळीमेळीत होत असतनाच मंत्री राणे यांनी शिवसेना प्रवेशासाठी आपण जिल्हा नियोजन मधून निधी देता का अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध झाले होते त्याबाबत सामंत यांना विचारले असता त्यावरून सदस्य धुरी तसेच जान्हवी सावंत आक्रमक झाल्या. धुरी यांनी हा विषय सभागृहाच्या बाहेरचा आहे म्हणत विरोध केला. मात्र आमदार राणे यांनी धुरी यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार राणे व धुरी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. मात्र यात पालकमंत्री सामंत यांनी हस्तक्षेप करत कोणीही वाद करू नका मी उत्तर देण्यास सक्षम आहे असे म्हणत प्रत्युत्तर दिले. त्यानंतर सभागृहातील वातावरण शांत झाले.आयत्या वेळच्या विषयावर धुरी यांनी कळणे मायनिंग मुळे झालेला अन्याय यावर आपले मत मांडले हे मायनिंग बंद करा असा ठराव घ्या असे नमूद केले पण राणे यानी याला नकार दिला.यावेळी आमदार केसरकर जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, दादा कुबल आदिनी आयत्या वेळच्या चर्चेत भाग घेतला.राणेंनी निभावली प्रति अध्यक्षाची भूमिकानियोजन बैठक वादळी होणार असे वाटत असतानाच केंद्रिय मंत्री राणे यांनी प्रति अध्यक्ष पदाची भुमिका निभावत आपल्या अनेक सदस्याना थोडक्यात बोलण्यास सागितले तर काहिना खाली बसवले त्यामुळेच लाबणारी बैठक थोडक्यात आटोपती घेतली मात्र सभा वादळी न होता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे Uday Samantउदय सामंत