कणकवली : राष्ट्रीय काँग्रेसच्या कणकवली शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक विलास बाळकृष्ण कोरगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या आदेशानुसार जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर यांनी सावंतवाडी येथे बुधवारी पक्षाच्या झालेल्या बैठकीच्या वेळी कोरगावकर यांना नियुक्तीचे पत्र दिले.माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्या सोबत अनेक पदाधिकारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रदेश काँग्रेसने विकास सावंत यांची काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष संघटना बांधणीला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून नवीन पदाधिकारी नियुक्ती केली जात आहे.सावंतवाडी येथे बुधवारी झालेल्या काँग्रेस बैठकीच्या वेळी विलास कोरगावकर यांची कणकवली शहर काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या मातोश्री जयमाला सावंत, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र मसुरकर, कणकवली तालुकाध्यक्ष महेंद्र सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, काशीनाथ दुभाषे, विभावरी सुकी, साक्षी वंजारी, नूतन सावंत, विजय कुडतरकर, सलोनी वंजारी, परब आदी पदाधिकारी उपस्थित होते. विलास कोरगावकर यांच्या नियुक्ती नंतर जयमाला सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.काँग्रेस कणकवली शहर अध्यक्षपदी विलास कोरगावकर यांची नियुक्ती झाल्यानंतर जयमाला सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी राजेंद्र मसुरकर, महेंद्र सावंत, रवींद्र म्हापसेकर, काशीनाथ दुभाषे, विभावरी सुकी, साक्षी वंजारी, नूतन सावंत, विजय कुडतरकर आदी उपस्थित होते.