शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

Lok Sabha Election 2019 : विनायक राऊत हे पर्ससीन मच्छीमारांचे दलाल : नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 1:41 PM

पारंपरिक मच्छीमार आपले दैवत असल्याचे खासदार विनायक राऊत हे सांगत आहेत. पण पारंपरिक मच्छीमार जर त्यांचे दैवत आहेत तर संसदेत त्यांनी त्यांचे किती प्रश्न मांडले ? तसेच आतापर्यंत एलईडी फिशिंग, पर्ससीन नेट मच्छीमारी याविषयक काय केले? याचे उत्तर त्यांनी द्यावे. त्यामुळे खासदार विनायक राऊत हे पारंपारिक मच्छिमारांची फसवणूक करीत असून ते अनधिकृत मच्छीमारी करणाऱ्या पर्ससीन नेट धारकांचे दलाल आहेत. अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.

ठळक मुद्दे विनायक राऊत हे पर्ससीन मच्छीमारांचे दलालनितेश राणे यांचा पत्रकार परिषदेत आरोप !

कणकवली : पारंपरिक मच्छीमार आपले दैवत असल्याचे खासदार विनायक राऊत हे सांगत आहेत. पण पारंपरिक मच्छीमार जर त्यांचे दैवत आहेत तर संसदेत त्यांनी त्यांचे किती प्रश्न मांडले ? तसेच आतापर्यंत एलईडी फिशिंग, पर्ससीन नेट मच्छीमारी याविषयक काय केले? याचे उत्तर त्यांनी द्यावे. त्यामुळे खासदार विनायक राऊत हे पारंपारिक मच्छिमारांची फसवणूक करीत असून ते अनधिकृत मच्छीमारी करणाऱ्या पर्ससीन नेट धारकांचे दलाल आहेत. अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.कणकवली येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे यांनी विनायक राऊत यांनी संसदेत मांडलेल्या प्रश्नांची यादीच पत्रकारांसमोर सादर केली. तसेच ते पुढे म्हणाले, खासदार राऊत यांनी पारंपरिक मच्छीमारांचा एकही प्रश्न संसदेत विचारलेला नाही.विनायक राऊत चांगले भजनी बुवा आणि कीर्तनकार आहेत. मात्र, जनतेने त्यांना भजन करायला नाही तर आपले प्रश्न सोडविण्यासाठी खासदार म्हणून निवडून दिले आहे.विनायक राऊत यांच्या निष्क्रियतेमुळेच पारंपारिक मच्छीमारांवर आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. १४ फेब्रुवारी रोजी खासदार राऊत पर्ससीन मच्छीमारांसोबत दिल्ली येथे 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करत होते का ? याचे त्यांनी उत्तर द्यावे. दिल्लीत कृषिमंत्र्यांशी खासदार राऊत यांनीच पर्ससीन मच्छीमारांची भेट घडवली होती. त्याची वृत्तेही प्रसिद्ध झाली आहेत.पारंपरिक मच्छीमार गरीब आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे देण्यासाठी पैसे नाहीत. याउलट पर्ससीननेटवाले राऊतांना आर्थिक रसद पुरवत आहेत. त्यामुळे राऊत हे पर्ससीन मच्छीमारांचे दलाल बनले आहेत. असा आरोप ही नितेश राणे यांनी यावेळी केला.ते पुढे म्हणाले, खासदार राऊत बीएसएनएल टॉवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर टाकून मोकळे झाले आहेत. मात्र त्यांनी त्या टॉवर मधून रेंज कधी मिळणार ते सांगावे ? तसेच त्यांनी बीएसएनएलची रेंज ग्राहकांना मिळवून द्यावी . तसे झाले तर त्यांचा जाहीर सत्कार आम्ही करू. असेही ते म्हणाले.ते पुढे म्हणाले, सीआरझेड हा केंद्रस्तरीय प्रश्न आहे. हा प्रश्न खासदार राऊत यांनी मागील ५ वर्षांत का नाही सोडवला? किनारपट्टीवरील जनतेने मागील निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मात्र देवबाग, तारकर्ली भागातील जनतेला आता महसूल विभागाकडून बांधकाम तोडण्याच्या नोटीशी दिल्या जात आहेत. या नोटीशी संबधित जनतेने फाडून कचऱ्याच्या पेटीत टाकाव्यात. त्या जनतेच्या हितासाठी आम्ही सोबत आहोत. पारंपरिक मच्छीमारांना त्रास देणाऱ्या मत्स्य अधिकारी वस्त यांना मीच वठणीवर आणले होते. त्यावेळी शिवसेनेनेच त्या अधिकाऱ्याला पाठीशी घातले होते. असेही ते यावेळी म्हणाले.फक्त २४ तास द्या, एलईडी फिशिंग बंद करून दाखवतो !आम्हाला फक्त २४ तास द्या . सर्व एलईडी फिशिंग बंद करून दाखवतो. फक्त पोलिसांना त्या २४ तासांत सुट्टीवर पाठवा. आम्ही असे काही करायला गेलो की पोलिसांमार्फत गुन्हे दाखल केले जातात. आमच्या लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात पारंपारिक मच्छीमारांना पूर्ण संरक्षण देणार, एलईडी फिशिंग पुर्ण बंद करणार असे मुद्दे असणार आहेत. आता रक्त सांडले तरी बेहत्तर , वेळ प्रसंगी रस्त्यावरील लढाई तसेच न्यायालयीन लढाई करावी लागली तरी पारंपरिक मच्छीमारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असेही आमदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.नाराजांकडे लक्ष द्यायला वेळ नाही!लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार जोरदार सुरू आहे. त्यामुळे भाजप सारख्या इतर पक्षातील नाराजांकडे लक्ष द्यायला सध्या वेळ नाही. असा उपरोधिक टोला एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान नितेश राणे यांनी लगावला .

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग