शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

सौभाग्यवतीचे वाण म्हणून झाडे भेट

By admin | Published: January 30, 2017 11:42 PM

हळदीकुंकू कार्यक्रमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश : तळेरेतील सुप्रिया वाड्येंचा अनोखा उपक्रम

नांदगाव : अलीकडे हळदीकुंकू समारंभाला सौभाग्यवतीचे वाण हे एखादी वस्तू देण्याची परंपरा नव्याने सुरू झाली आहे. हळदी कुंकवासोबतच अनेक वस्तू वाटण्याची नवी पद्धत रूढ झाली. त्यात मग स्टील अथवा प्लास्टिकच्या वस्तू असतात. मात्र तळेरे येथील सुप्रिया वाड्ये यांनी हळदीकुंकू समारंभातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत अनेकांपुढे एक आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावर्षी केळी, पपई व इतर मिळून सुमारे ३०० पेक्षा जास्त झाडांचे वाटप केले.याबाबत माहिती घेतली असता त्या म्हणाल्या की, हळदीकुंकू सर्वत्र होतच असते. त्यातून सर्वानाच उपयोगी पडेल असे काहीतरी द्यावे असे वाटले. त्यामुळे मागच्यावेळी मिनी तगर ही झाडे वाटप केली. मात्र, सगळ््यांकडेच झाडे लावायला जागा उपलब्ध होत नाही. फ्लॅटमध्ये राहणारे अनेकजण कुंडीमध्येही झाडे लावून आपली आवड जोपासतात. त्याकरिता यावर्षी केळी, पपई व शोभिवंत झाडांचे वाटप करण्यात आले. अलीकडील काही वर्षात हळदीकुंकू समारंभात सौभाग्यवतीचे वाण म्हणून भांडी दिली जातात आणि भांडी किंवा इतर वस्तू नित्याच्याच झाल्या असल्याने प्रत्येकाला उपयोगी पडेल आणि त्याचा योग्य विनिमय होईल असे काहीतरी द्यावे असे मनात होतेच. त्यासाठी प्रत्येकाच्या घरी आपल्या सर्वांच्या उपयोगी पडेल असे झाड असावे यासाठी केळीचे झाड द्यावे असे ठरवले. त्यातून पर्यावरण रक्षणही होईल, झाडांची संख्या वाढीस लागेल. झाडही द्यावे ते प्रत्येकाला लावता आले पाहिजे आणि उपयोगीही पडले पाहिजे असा दुहेरी हेतू ठेवून ज्यांच्या घरामागे परसबाग आहे अशांसाठी केळी व पपईचे झाड आणि जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांना शोभिवंत झाडे देण्यात आली. विशेष म्हणजे या वेगळ््या प्रकारच्या उपक्रमाचे महिलांकडून स्वागत झाले आणि कौतुकही वाटले. केळी, पपई हीच झाडे देण्यामागचे कारण सांगताना त्या म्हणाल्या की, गणपतीसह इतर हिंदू सणांमध्ये केळीच्या पानाचे खूप महत्त्व आहे. त्यासाठी टिश्यू कल्चर जातीच्या केळीची रोपे यावर्षी वाटली. या केळीच्या झाडाला ११ महिन्यात केळी लागतात. तसेच एका रोपातून चार रोपे वाढतात. शिवाय केळी व पपई ही झाडे वाढण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. तसेच ती औषधीही असतात, सर्वसामान्यांना अनेकदा घरगुती कार्यक्रमात उपयोगीही पडतात. (वार्ताहर)