शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

विजयदुर्ग किल्ल्याला भेट, गतवैभवासाठी प्रयत्न करणार  : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 3:25 PM

विजयदुर्ग किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणार असून किल्ल्याची महती कमी होऊ देणार नाही. ऐतिहासिकपणा जोपासला जाईल, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विजयदुर्ग किल्ल्याच्या पाहणीवेळी केले.

ठळक मुद्दे विजयदुर्ग किल्ल्याला भेट, गतवैभवासाठी प्रयत्न करणार  : उदय सामंतमहती कमी होऊ देणार नाही, ऐतिहासिकपणा जोपासला जाईल  : सामंत

देवगड : विजयदुर्ग किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणार असून किल्ल्याची महती कमी होऊ देणार नाही. ऐतिहासिकपणा जोपासला जाईल, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विजयदुर्ग किल्ल्याच्या पाहणीवेळी केले.यावेळी खासदार विनायक राऊत, राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, संदेश पारकर, संजय पडते, नागेंद्र परब, विकास कुडाळकर, सचिन खडपे, सुनील खडपे, वर्षा पवार, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार मारुती कांबळे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर, उपसरपंच महेश बिडये, उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, तालुकाप्रमुख मिलिंंद साटम, प्रसाद करंदीकर, संतोष साटम, विभागप्रमुख संदीप डोळकर, रमाकांत राणे, मुनाफ ठाकूर, राजू परुळेकर आदी उपस्थित होते.यावेळी सामंत म्हणाले, विजयदुर्ग किल्ल्याचे संपूर्ण बजेट तयार करण्यात येणार असल्याने किल्ल्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा शासनाचा प्रयत्न असणार आहे. यासाठी पुरातत्त्व विभागाशीही चर्चा करण्यात आली आहे. गरज भासल्यास किल्ल्यासाठी जिल्हा नियोजनमधूनही निधी देऊ.

येत्या वर्षभरात किल्ल्याच्या कामाला सुरुवात होईल. विजयदुर्ग ग्रामपंचायतीची नवीन इमारत उभारण्यासाठीही निधी देण्यात येईल. यासाठी ग्रामपंचायतीने जागेचा प्रश्न मार्गी लावावा. तसेच विजयदुर्ग विकासासाठीदेखील आराखडा तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.किल्ला जतन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे वेळोवेळी निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला आहे. राज्य सरकारच्या माध्यमातूनही विजयदुर्ग किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी खर्च केला जाणार आहे. इतिहासाची साक्ष देणारा विजयदुर्ग किल्ला हा अनेक पर्यटकांना आकर्षित करीत आहे.

लाखो पर्यटक येथे दाखल होत असल्याने पर्यटन एके पर्यटनाच्या माध्यमातूनही या भागाचा विकास केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कुणकेश्वर मंदिरालाही भेट दिली. तसेच तांबळडेग येथील वाहून गेलेला रस्ता व समुद्राच्या पाण्याने केलेल्या अतिक्रमणाची पाहणीही त्यांनी केली. त्याही ठिकाणी निधी उपलब्ध करून समुद्राच्या पाण्यापासून होणारी धूप रोखली जाण्यासाठी संरक्षण भिंंत उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.मराठ्यांचे आरमारप्रमुख आनंदराव धुळप यांच्या वंशजांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विजयदुर्ग किल्ल्यावरील चिलखती तटबंदीच्याच कोसळलेल्या संरक्षक भिंंतीची तसेच कान्होबा मंदिर व अन्य भागाची पाहणी करण्यात आली. या दौऱ्यात गिर्ये गावचे उपसरपंच जहीर ठाकूर यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तसेच आंबा बागायतदार सुधीर जोशी यांनी पालकमंत्री व खासदार यांची भेट घेऊन आंबा कॅनिंगला हमी भाव मिळावा या विषयांबरोबर अन्य विषयांवर चर्चा केली.कुणकेश्वर देवस्थानला भेटश्री देव कुणकेश्वर मंदिर परिसरातील विकासकामे, सुशोभिकरण व अन्य पर्यटन सुविधांबाबत श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी व विश्वस्त यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांची देवगड तालुका दौऱ्यात कुणकेश्वर मंदिर येथे भेट घेतली व निवेदन सादर केले तसेच सविस्तर चर्चा केली.

या चर्चेत प्रामुख्याने कुणकेश्वर मार्गावरील रस्ते दुरुस्ती, बॅरिकेटींग करणे, देवगड मांजरेकर नाका तारामुंबरी पूल ते कुणकेश्वर ग्रामपंचायत रस्ता डांबरीकरण करणे, मंदिर परिसर सुशोभिकरण, प्रवेशद्वार कामे पूर्णत्वास जावीत. समुद्रकिनारी पार्किंग, बैठक व्यवस्था, शौचालय, चेंजिंग रूम, ओपन जिम व्हावी.शासनाच्या धार्मिक क्षेत्र विकास निधीमधून सुसज्ज भक्तनिवास, समुद्र तटरक्षक संरक्षक भिंत, मंदिराच्या मागील बाजूने पर्यटन संकुलपर्यंत जाणारा रस्ता तयार करणे, जलक्रीडा गार्डनची निमिती करणे. या विकास कामांना चालना देण्याची आग्रही मागणी केली आहे. 

टॅग्स :Fortगडsindhudurgसिंधुदुर्गUday Samantउदय सामंत