सिंधुदुर्गनगरी दि. ३१ : राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ/ग्रापंनि-२0१७/प्र.क.६/का-८ अन्वये दिनांक २३ आॅगस्ट २0१७ रोजी माहे डिसेंबर २0१७ मध्ये मुदती संपणाºया ३४0 ग्रामपंचायतींसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या ग्रामपंचायतींसाठी दिनांक २८ आॅगस्ट २0१७ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.या मतदार यादी बाबत कोणतीही हरकत असल्यास संबंधित मतदाराने आपला हरकत अर्ज दिनांक ४ सप्टेंबर २0१७ पर्यंत संबंधित तहसिलदार कार्यालयामध्ये समक्ष सादर करण्याचा आहे. तरी कृपया माहे डिसेंबर २0१७ मध्ये मुदती संपणाºया ३४0 ग्रामपंचायतींशी संबंधित सर्व मतदारांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन सिंधुदुर्गचे नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकाºयांनी केले आहे.