शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

मतदार ‘अच्छे दिन’च्या नावाखाली फसणार नाहीत

By admin | Published: April 01, 2016 1:44 AM

सुनील भोगटेंचा दावा : कुडाळ नगरपंचायतीवर काँग्रेस आघाडीची निर्विवाद सत्ता येईल

रजनीकांत कदम-- कुडाळ ‘अच्छे दिनाच्या’ नावाखाली स्थापन झालेल्या युती सरकारने अच्छे दिन आणले नसून त्यांना आता मतदार फसणार नाही. त्यामुळे कुडाळचे मतदार कुडाळच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या आघाडी सोबत राहून कुडाळ नगरपंचायतीवर आघाडीचीच सत्ता आणतील, असा विश्वास काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष सुनील राधाकृष्ण भोगटे यांनी व्यक्त केला आहे.कुडाळवासीयांचे नगरपंचायतीचे कित्येक वर्षांचे स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्णत्वास येत आहे. कुडाळ ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत झाले आणि सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली नगराध्यक्ष कोण आणि कोणत्या पक्षाचा आणि यातच मतदानाची तारीख १७ एप्रिल २०१६ जाहीर झाली. इच्छुक उमेदवारांची प्रत्येक पक्षाकडे उमेदवारी मिळविण्यासाठी मिळणाऱ्या मताची गोळा बेरीज सुरु केली. परंतु राष्ट्रीय काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या पालकमंत्री पदाच्या काळात सिंधुदुर्गबरोबरच कुडाळचा झालेला विकास तसेच माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळच्या विकासाची वाटचाल निश्चितच नगरपंचायतच्या विजयाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे आणि म्हणून निश्चितच कुडाळ नगरपंचायतीवर राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता निश्चित येईल व नगराध्यक्ष हा काँग्रेसचा असेल, असे सुनील भोगटे म्हणाले.तसेच ते पुढे म्हणाले की, आज देशामध्ये अच्छे दिनाच्या नावाखाली सरकार स्थापन झाले. परंतु अच्छे दिन न आल्यामुळे या सरकारवरील विश्वास उडाला. म्हणून अनेक राज्यातील निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना अपयश पत्करावे लागले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला परंतु विकासाच्या तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीचे नुकसान, महागाई, रोजगार या सर्व स्तरावर त्यांना अपयश आले. हे लोकांनी ओळखले आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक व्यक्तीही काँग्रेसच्या बाजूनेच मतदान करणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आज कुडाळ शहराच्या ज्या प्रामुख्याने गरजा आहेत त्या गरजा माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे व आमदार नीतेश राणे यांच्या व आघाडीच्या माध्यमातून आम्ही पूर्णत्वास नेणार आहोत. कुडाळ शहराचा विकास करताना प्रामुख्याने येथील सर्व रस्ते डांबरीकरण करणे, सर्व रस्त्यांवर वीज (स्ट्रीट लाईट), वाहतुकीची कोंडी पाहता रस्ता रुंदीकरण करून सुशोभिकरण करणे, खास मुलांसाठी चांगल्या प्रकारचे गार्डन उपलब्ध करणे, नाना- नानी पार्क (ज्येष्ठ नागरिकांसाठी), भुयारी गटारांसाठी प्रयत्न करणार, पार्किंगची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उत्तम अशी योजना राबिवणे अशा गोष्टी प्रामुख्याने हाती घेणार आहोत, असेही भोगटे म्हणाले. त्यामुळे मतदार काँग्रेस आघाडीच्या मागे उभे राहतील, असा आशावाद भोगटे यांनी व्यक्त केला आहेराणेंवर जबाबदारी सोपवतीलविविध विकास कामे व मुलभूत सोयी सुविधा पुरविण्याचा मनोदय ठेवून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत. मला विश्वास आहे की सर्व मतदार हे मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर विकासाची जबाबदारी सोपवून त्यांच्या सर्व सेवकांना कुडाळची सेवा करण्याची संधी देतील, यात तिळमात्र शंका नाही.- सुनील भोगटे, काँग्रेस,जिल्हा उपाध्यक्ष