शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

१०४ गावात अद्याप प्रसाधनगृहाची प्रतीक्षा

By admin | Published: February 17, 2016 12:56 AM

चालक-वाहकांची गैरसोय : केवळ ९९ ठिकाणीच सोय, कोणताही तालुका परिपूर्ण नाही

रत्नागिरी : शासनाकडून गावागावातून निर्मल व हागणदारीमुक्त योजना राबवत आहे. परंतु जिल्ह्यातील १०४ गावात रात्रवस्तीसाठी घेऊन जाणाऱ्या एस. टी. चालक - वाहकांसाठी प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध झालेली नाही. जिल्ह्यातील नऊ आगारातून एकूण २०३ रात्रवस्त्यांपैकी केवळ ९९ ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.राज्य परिवहन महामंडळातर्फे नऊ आगारांतील २०३ निरनिराळ्या खेडेगावात रात्रवस्तीसाठी गाड्या पाठवण्यात येतात. वस्तीसाठी गावात जाणाऱ्या वाहक, चालकांसाठी प्रसाधनगृहाची व निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु १०४ गावे या सुविधेपासून वंचित आहेत.दापोली तालुक्यातील चार गावांमध्ये पणदेरी मोहल्ला, उन्हवरे, हर्णै, पोफळवणे, मंडणगड तालुक्यातील ३ गावांमध्ये आवाशी घराडी, भोळवली, म्हाप्रळ, खेड तालुक्यातील ९ गावांपैकी चोरवणे, शिरगाव, पन्हाळजे, तुळशी, बिरमणी, सवणस, कासई, खोपीशिरगाव, कुरवळजावळी गावात सुविधा उपलब्ध नाहीत.चिपळूण तालुक्यातील २० गावांमध्ये वाघिवरे, स्वयंदेव, गांग्रई, वीर, करंबवणे, धायजेवाडी, तळवडे गोवळ, तिवडी, कोसबी, मालदोली, मुर्तवडे, नायशीवडेरू, पातेपिलवली, गुढेकोंढवी, तळसर, सावर्डे, तोंडली, नांदिवसे, ताम्हणमळा तसेच गुहागर येथील पांगारी, पाभरे येथे असुविधा आहे. संगमेश्वर तालुक्यातील ३० गावांमध्ये चिखली, पाचांबे, पिरंदवणे, आंबवली, करजुवे, कानरकोंड, कातुर्डी, निवळी, नेदरवाडी, देवडे, तांबेडी, मुचरी, बामणोली, ओझरे (खडीकोळवण) मासरंग, नायरीतिवरे, चाफवली भटाचा कोंड, कुळये पुनर्वसन, फणसट, पाचांबे येडगेवाडी, बडदवाडी, धामापूर (करजुवे), कासेपेढांबे, तळेकांटे, देवळेवाणेवाडी, परचुरी, चोरवणे, घाटीवळे, मांजरे, माखजन गावात शौचालय सुविधा नाही. रत्नागिरी तालुक्यातील निरूळ, हरचेरी, मांडवकरवाडी अहिल्यानगर, मिरवणे, ढवळेवाडी, रेववाडी, मालगुंंड, गावडेआंबेरे, कशेळीकोंड, डोर्ले तसेच लांजा तालुक्यातील इसवली, इंदवटी, हर्चे, आगवेकोट गावातही शौचालय असुविधा आहे. राजापुरातील २२ गावामध्ये भालावली, कुंभवडे, ताम्हाणे, चुनाकोळवण, नाणार, मोरोशी, तुळसुंदे, शिरसे, हातदे, वेत्ये, घाडीवाडी, काजिर्डा, झर्ये, आजिवली, गुरववाडी नाटे, आंबोळगड, बेणगी, आडिवरे गावात असुविधा आहे. (प्रतिनिधी)