शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘त्या’ अपघाताची नोंद चुकीची

By admin | Published: September 13, 2015 9:39 PM

देवगड पोलिसांना निवेदन : सत्यवान मणचेकरांची मागणी

देवगड : देवगड तालुक्यातील किंजवडे आंबोळवहाळ नजीक झालेल्या बोलेरो पिकअप व प्लॅटीना बजाज यांच्या अपघाताची नोंद देवगड पोलीस स्थानकात चुकीच्या पद्धतीने झाली असून या अपघाताची सखोल चौकशी होऊन योग्य त्या पद्धतीने तपास करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या चंद्रकांत मणचेकर यांचे भाऊ सत्यवान मणचेकर यांनी देवगड पोलिसांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. या घटनेचा तपास योग्य त्या रितीने न झाल्यास उपस्थित ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. कणकवली हुंबरट येथील बोलेरो पिकअप लक्ष्मीकांत तेंडुलकर आरेमार्गे कणकवली असे घेऊन येत असताना दुचाकीस्वार चंद्रकांत मणचेकर यांची धडक बसली अशी तक्रार पोलीस स्थानकात करण्यात येवून गुन्हा नोंद झाला. ग्रामस्थांच्या तसेच चंद्रकांत मणचेकर यांचा भाऊ सत्यवान मणचेकर यांच्या तक्रारीनुसार बोलेरो पिकअप ही आरेमार्गे कणकवली अशी गुरांची वाहतूक करीत असताना या मार्गावर आरे येथील चंद्रकांत मणचेकर आपल्या कमी वेगात नेहमीप्रमाणे मोटारसायकल घेऊन येत होता. दरम्यान बोलेरो पिकअपमध्ये गुरे असल्याने व टेंपो शिरगांव पोलीस चेकनाका चुकवून भरधाव वेगाने आरे येथून कणकवलीकडे जात असताना टेंपो चालकाने दुचाकी चालकाला धडक दिली व त्याची विचारपूस न करता त्याला तेथेच टाकून पोलीस स्थानक गाठले. त्यात त्याला गंभीर दुखापत होऊनही तो तेथून निघून गेला. येथील काही अंतरावर असलेल्या ग्रामस्थांनी वाहनातील गुरे तसेच हा प्रसंग पाहिला होता. हा अपघात सकाळी १० च्या सुमारास होऊन सायंकाळी ४ वाजेपर्यंत त्या वाहनातील गुरे बाहेर बांधून ठेवली होती असे समजते. यात पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करीत असताना गावातील पोलीस पाटील वगळता कुटुंबियांपैकी कुणीही नव्हता. अन्य ग्रामस्थ गावातील या जखमीला बाहेर नेण्याकरीता गडबडीत असताना अपघाताबाबत चुकीच्या नोंदी करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे व कुटुंबियांचे म्हणणे आहे. तरी या प्रकरणाचा योग्य त्या रितीने तपास होऊन निरपराध मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.दरम्यान, या अपघाताच्या घटनेतील बोलेरो पिकअप चालक तेंडुलकर यांना ताब्यात घेऊन जामिनावर सोडण्यात आले असून बोलेरो पिकअप देवगड पोलीस स्थानकात उभी आहे. हे निवेदन देताना सत्यवान मणचेकर यांच्यासह सरपंच महेश पाटोळे, उपतालुकाप्रमुख उमेश कदम, नितीन जेठे, बंटी जेठे, सतीश कदम, दीपक साळसकर, सिताराम कदम, मेघ:श्याम पाटोळे, एकनाथ कदम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)