संजीव वरे -- वाई तालुक्यात धोम धरणाच्या निर्मितीला चाळीसहून अधिक वर्षे लोटली आहे. धरणात येथील शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या, अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. धरणामुळे राज्यातील हजारो एकर जमिनी ओलिताखाली आहे. मात्र, धरणाच्या काठावरील व शेतीपाण्यापासून वंचित असलेल्या गावातील शेतकऱ्यांची जमीन तहानलेली आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने जललक्ष्मी योजनेतून पाणी देण्याची मागणी होऊ लागली आहे.वाई तालुक्याच्या पश्चिम भागात कृष्णा नदीवर धोम व बलकवडी ही दोन धरणे बांधण्यात आली. या भागात दरवर्षी पावसाचे प्रमाण जास्त असते; परंतु यावर्षी पाऊस कमी पडल्याने बलकवडी धरण भरले. परंतु धोम धरणात सरासरी चाळीस टक्केच पाणीसाठा झाला आहे. परिणामी सर्वत्र दुष्काळी व पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होत आहे. धोम धरणनिर्मितीच्या वेळी धरणाच्या काठावरील व शेतीपाण्यापासून वंचित असलेल्या गावांना सहा टक्के पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला होता. व शासनाच्या वतीने जललक्ष्मी योजना करून दिली जाणार होती. या योजनेसाठी येथील जनतेने मोठा लढा दिला. यावर्षी सर्वत्र पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट सामोरे येत आहे. जललक्ष्मी योजनेतून पाणी सोडावे ,अशी मागणी या परिसरातील शेतकरी व जनतेतून होऊ लागली आहे. त्यामुळे कृष्णेचे पाणी शिवारात पाहण्याची चाळीस वर्षांपासूनचे स्वप्त आता तरी पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या योजनेतून पाणी सोडण्याची मागणी माजी सभापती विजयसिंह नायकवडी, बाजार समितीचे संचालक दत्ता भणगे, महादेव वाडकर, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष महेंद्र पुजारी, मालतपूरचे माजी सरपंच किसन वाडकर, दसवडीचे सुनील फणसे, कुसगावचे उपसरपंच विनायक वाडकर, आनंदराव हगवणे, सदाशिव वरे, हरिभाऊ वरे, एकसरचे माजी सरपंच रघुनाथ मालुसरे, बाळकृष्ण तरडे, पसरणीच्या उपसरपंच शुभांगी महांगडे, विलास येवले, बाजीराव महांगडे, माजी सरपंच बाबू शिर्के आदींनी आमदार मकरंद पाटील यांच्याकडे केली आहे. दुष्काळी भागाला पाणी सोडणारयावर्षी महाबळेश्वर आणि धोम, बलकवडी धरण परिसरातही पाण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. त्यामुळे धोम धरणात फक्त चाळीस टक्केच पाणीसाठा झाला. गेल्या काही दिवसांत बलकवडी धरणातून धोम धरणात मोठ्या प्रमाणात सोडले आहे. त्यामुळे दुष्काळी भागाला व दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन पाणी नियोजनाच्या तयारीला लागले आहे.४५ कोटींचा निधी आलाया योजनेसाठी चाळीस वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. अखेर बलकवडी धरणाच्या या पाण्यात या योजनेची जलवाहिनी टाकली गेली. धोमधरणातील राखीव पाणीसाठा व बलकवडी धरणात ठेवून बंदिस्त जलवाहिनेने बलकवडी ते वाई ग्रामीण अशी सुमारे २५ किलोमीटर अंतराहून जास्त लांबून पाणी आणले गेले आहे. मकरंद पाटील या मतदारसंघाचे आमदार झाल्यानंतर ४५ कोटींचा निधी उपलब्ध झाला. संपूर्ण सिमेंट जलवाहिनी व जागोजागी पाणी वितरणाची दारी व एअरव्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून वाई तालुक्याच्या पश्चिम भागाची मागणी असलेली जललक्ष्मी योजनेचे काम पूर्ण झाले आहे. येत्या चार दिवसांत या जलवाहिनीतून पाणी सोडून यशस्वी चाचणी घेण्यात येणार आहे. या योजनेमुळे या भागातील पिण्याचा व शेतीपाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.- मकरंद पाटील, आमदार
चाळीस वर्षांपासून पाण्याची आस!
By admin | Published: November 19, 2015 9:39 PM