सिंधुदुर्गनगरी : कणकवली तालुक्यातील देवघर मध्यम प्रकल्प ६२.०० टक्के भरला असून या धरणाच्या विमोचकातून सध्या ३४.७७ घ.मी. प्रति सेकंद विसर्ग सुरू आहे. सध्या या धरणात ६0.७७४0 द.ल.घ.मी पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ८४.४0 मि.मी. इतका पाऊस झाला असून १९४0.३0 मि.मी. इतका एकूण पाऊस झाला आहे.
यंदाच्या वर्षी घळभरणी झालेल्या अरुणा प्रकल्पामध्ये ४0.८५ टक्के पाणीसाठा झाला असून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १४0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत २0२0.२0 मि.मी एकूण पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २२७.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.नाधवडे, सनमटेंब आणि तिथवली लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून नाधवडेत ९७.९२ टक्के, सनमटेंब - ९५.८२ टक्के आणि तिथवली - ८0.६२ टक्के आहे. ओझरम लघु पाटबंधारे प्रकल्पातून १८.५९ घ.मी. प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. तिलारी आंतरराज्य प्रकल्प ७५.७८ टक्के भरला असून धरणात सध्या ३३९.00८0 द.ल.घ.मी पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात २७.४0 मि.मी पाऊस झाला असून १८९९.६0 मि.मी. एकूण पाऊस झाला आहे.सरासरी गतवर्षी पेक्षा ५७९ मिलीमीटरने घटली१ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी १६०५ मिलीमीटर पाऊस झाला असून गेल्या वर्षी याच काळात जिल्ह्यात सरासरी २१८४.७८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ८७.२ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला आहे.
तालुका निहाय चोवीस तासात झालेला पाऊस पुढील प्रमाणे कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग ८३ (१८०३), सावंतवाडी ४५ (१३५९), वेंगुर्ले २२७.६ (१८३७.०४), कुडाळ ८८ (१५९३), मालवण ४७ (१३१३), कणकवली ११४ (१८४४), देवगड १८ (१२५६), वैभववाडी ७५ (१८४३) पाऊस झाला आहे.