शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

जलशुध्दिकरण कचऱ्यात!

By admin | Published: November 13, 2015 9:34 PM

पाणी शुद्धतेबाबात प्रश्नचिन्ह : साळवी स्टॉपचा कचरा प्रश्न चिघळणार

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात कचऱ्याच्या ढिगांमध्ये जलशुध्दिकरण प्रक्रिया होत असून, रत्नागिरीकरांना मिळणाऱ्या पाण्याच्या शुध्दतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप परिसरातील या कचऱ्याच्या दुर्गंधीने व ढीग दररोज पेटवून दिले जात असल्याने नागरिकांना जगणे कठीण बनले आहे. याबाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास कचरा आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. रत्नागिरी शहरातील दररोज संकलित होणारा कचरा गेल्या काही वर्षांपासून शहराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात टाकला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कचऱ्याच्या दुर्गंधीचा स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात अनेक रुग्णालये आहेत. तेथे येणाऱ्या रुग्णांनाही या दुर्गंधी व धुराचा फटका बसत आहे. संपूर्ण शहराचा कचरा टाकण्याचे हे ठिकाण बदलावे व अन्यत्र कचरा टाकला जावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक करीत आहेत. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. आता या भागाचे प्रतिनिधीत्व करणारे नगरसेवक प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी स्थानिकांचा हा प्रश्न नेटाने लावून धरला आहे. याबाबत त्यांनी नगरपरिषदेच्या सभेतही आवाज उठविला असून, तत्काळ या कचरा डंपिंगची सोय अन्यत्र करावी, अशी मागणी केली आहे. असे झाले नाही तर स्थानिक नागरिकांच्या रोषाला नगरपरिषदेला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. रत्नागिरीची लोकसंख्या ७७ हजारांपेक्षा अधिक असून, रत्नागिरी ही जिल्ह्याची राजधानी असल्याने हजारो लोक रोज शहरात ये-जा करीत असतात. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. दररोज पालिकेच्या कचरा वाहनांमधून २२ ते २४ टन कचरा संकलित केला जातो. हा सर्व कचरा साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारातील मोकळ्या जागेत टाकण्यात येतो. गेल्या काही वर्षात याठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या कचरा समस्येबाबत नगरपरिषदेने मार्ग न काढल्यास येत्या पंधरवड्यात हा प्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)दहा वर्षांपूर्वी निर्देश : घनकचरा प्रकल्पाचे भिजत घोंगडेसाळवी स्टॉप येथील कचऱ्यावर प्रक्रिया करणारा घनकचरा प्रकल्प नगरपरिषदेने उभारावा, असे निर्देश शासनाकडून दहा वर्षांपूर्वी देण्यात आले आहेत. मात्र, जागा मिळत नसल्याने या प्रकल्पाचे घोंगडे भिजत पडले आहे. दांडेआडोमच्या घनकचरा प्रकल्प प्रस्तावालाही जवळपास पूर्णविराम मिळाल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे हा प्रकल्प करावा कुठे, असा गंभीर प्रश्न नगरपरिषद प्रशासनापुढेही उभा ठाकला आहे. याबाबत पालिकेतील नगरसेवक व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही हात वर केले असून, ही समस्या सुटणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांची घुसमटशहरानजीकच्या साळवी स्टॉप येथे टाकण्यात येणारा कचरा सायंकाळच्या वेळेत जाळण्यात येत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. सायंकाळी या ठिकाणाहून जाताना नागरिकांची घुसमट होते, तरीदेखील प्रशासन ढिम्म आहे, याचे आश्चर्य आहे.