शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

पाणीटंचाईची दाहकता वाढली

By admin | Published: April 07, 2017 10:55 PM

दापोली तालुका : देवाच्या डोंगरपाठोपाठ अनेक गावांमध्ये येणार पाणीटंचाईचे संकट

शिवाजी गोरे ल्ल दापोलीदापोली तालुक्यातील देवाचाडोंगर येथील पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेऊन या गावाला टँकरने पाणीपुरवठा सुरु झाला आहे. या गावापाठोपाठ आता तालुक्यातील अन्य गावांमध्येही पाणीटंचाई भीषण रुप धारण करु लागली आहे. तालुक्यातील ९ गावे व ३१ वाड्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. लवकरच या गावांमध्येही पाण्याचा टँकर धावणार आहे. मात्र, पुढील आठवड्यापर्यंत पाणीटंचाईचे संकट अजून भीषण होण्याची शक्यता आहे. मात्र, या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा दावा केला जात आहे.देवाचाडोंगर येथील धनगर वस्तीला दरवर्षी पाणीटंचाईची झळ बसते. दापोलीच्या तहसीलदार कविता जाधव, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, पाणीपुरवठा विभागाचे शेंडे यांनी प्रत्यक्ष पाणीटंचाईची पाहणी करुन देवाचाडोंगर येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याला हिरवा कंदील दाखवला. देवाचाडोंंगर येथे टँकरने पाणीपुरवठा सुरु झाल्यामुळे येथील धनगरवस्तीला थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र, दरवर्षी एप्रिल महिन्याची चाहूल लागताच पाणीटंचाईचे संकट भीषण रुप धारण करते. एप्रिल व मे महिन्यातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेत प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्याची पूर्ण तयारी केली आहे. परंतु, याचवेळी प्रशासनाकडे टँकरचा तुटवडा आहे. तसेच नादुरुस्त टँकर ही त्यापैकीच एक समस्या आहे. अपुऱ्या टँकरमुळे टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. तहसीलदार टँकर अधिगृहीत करुन ते पाणीपुरवठाकरिता उपलब्ध करुन देतात. देवाचाडोंंगर येथील धनगरवस्तीने टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केल्यानंतर तब्बल २० दिवसांनी तेथे टँकर पोहोचला.देवाचाडोंगर, जामगे याठिकाणी एक दिवसआड टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील खाडी किनारपट्टीवरील अनेक वाड्याही यावर्षी तहानलेल्या आहेत. या वाड्यांनीसुद्धा टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. परंतु, शासकीय टँकर नादुरुस्त असल्याने टँकर अधिग्रहणाला विलंब होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करताना पंचायत समिती प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे.जामगे, चिखलगाव, अडखळ, मुरुड, ओणनवसे, उसगाव, उंबरशेत, पंचनदी, करजगाव या गावांमधील देवाचाडोंंगर, किन्हळ, वाघवे, बोवणेवाडी, भैरीचाकोंड, तांबडीचा कोंड, शिपवाडी, भंडारवाडा, नवानगर, पश्चिमवाडी, पूर्ववाडी, भोईवाडा, सुतारवाडी, बौद्धवाडी, रामाणेवाडी, मधलीवाडी, धोपटवाडी, गणेशवाडी, बौद्धवाडी, नबीमोहल्ला, नवानगर, संभाजीनगर, चिंचवळवाडी, डायरा, बौद्धवाडी, कोळीवाडा, भाटवाडी, गावठाणवाडी, तिवरे - राहटेवाडी, निंगावळेवाडी, झगडेवाडी, मुकादमवाडी, कोळीवाडा या ३१ वाड्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले आहे.दापोली तालुक्यातील ९ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईला सुरुवात झाली असून, यापुढील काळात पाणीटंचाई अजून भीषण होणार आहे. टंचाईग्रस्त गावांमधून टँकरची मागणी करण्यात आली असून या गावांची तहान भागवण्यासाठी अजून दोन ते तीन टँकरची गरज आहे. टंचाईग्रस्त गावे ही एकमेकांपासून दूरवर तसेच विरुद्ध दिशेला असल्याने टँकरच्या संख्येत वाढ करणे आवश्यक आहे. परंतु, टँकर किती उपलब्ध होतात यावर बरंच काही अवलंबून आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी दापोली तालुक्यात पाणीटंचाई थोडी उशिराने सुरु झाली आहे. पुढील काळात ही पाणीटंचाई अधिक तीव्र होणार असल्याने यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.