शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीत पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 11:32 AM

गतवर्षी अनियमित पावसामुळे चालूवर्षी ऐन उन्हाळी हंगामात पाण्याची पातळी कमी होऊन पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. यातच देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीत एकूण ३ हजार नळग्राहक असून यापूर्वी त्यांना १९ लाख लीटर पाणीपुरवठा होत असे परंतु सद्यस्थितीत या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली असून ३ दिवसानंतर १२ लाख लीटर पाणीपुरवठा नागरिकांना केला जात आहे. या पाणीकपातीतीत नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करून नगरपंचायत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी केले.

ठळक मुद्देदेवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीत पाणीटंचाईचे संकटनागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा  : योगेश चांदोस्कर

देवगड : गतवर्षी अनियमित पावसामुळे चालूवर्षी ऐन उन्हाळी हंगामात पाण्याची पातळी कमी होऊन पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. यातच देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीत एकूण ३ हजार नळग्राहक असून यापूर्वी त्यांना १९ लाख लीटर पाणीपुरवठा होत असे परंतु सद्यस्थितीत या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली असून ३ दिवसानंतर १२ लाख लीटर पाणीपुरवठा नागरिकांना केला जात आहे. या पाणीकपातीतीत नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करून नगरपंचायत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी केले.देवगड-जामसंडे नगरपंचायत कार्यालयात ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष संजय तारकर, बांधकाम सभापती निरज घाडी, महिला बालकल्याण सभापती उज्ज्वला अदम, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.नगराध्यक्ष चांदोस्कर म्हणाले की, देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील नळग्राहकांना यापूर्वी ४ लाख लीटर पाणी पाडागर येथून व ८ लाख लीटर पाणी दहीबाव येथून घेतले जात होते. परंतु दहीबाव अन्नपूर्णा नदीतील गाळ काढल्यानंतर नदीच्या पात्रातील पाणी जॅकव्हेलच्या खाली गेल्याने ते प्रमाण ८ लाखांवरून ४ लाख एवढे करण्यात आले व उर्वरित ८ लाख लीटर पाणी पाडागर येथून घेतले जात आहे.

अशा प्रकारे एकूण १२ लाख लीटर पाणीसाठा नागरिकांना ३ दिवस आड करून पुरविण्यात येत आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणतेही पाणीस्त्रोत नसल्याने प्रसंगी गाळ उपसल्यानंतर पुरवठा करण्यात आलेले गढूळ पाणी नागरिकांनी उकळून, गाळून पिणे आवश्यक असल्याचे मत नगराध्यक्ष चांदोस्कर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Waterपाणीsindhudurgसिंधुदुर्ग