सावंतवाडी : गेल्या अनेक वर्षांपासून सावंतवाडी नगरपालिकेने माजगाव, चराठा या गावांना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या ग्रामपंचायत सोबतचा करार संपल्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेने अखेर पाणी पुरवठा करण्याचा निर्णय गुरूवारपासून थांबवला असून, कुणकेरीला पुरवठा होणारा अतिरिक्त पाणीसाठाही थांबविला आहे. माजगाव ग्रामस्थांनी नगराध्यक्ष संजू परब यांची भेट घेतली पण परब यांनी टँकरने पाणी पुरवठा करू असे सांगितले. आमदार दीपक केसरकर यांनीही यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.सावंतवाडी नगरपालिका माजगाव, चराठा, कोलगाव, कुणकेरी या ग्रामपंचायत क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा करत आहे. अनेक वेळा सावंतवाडी नगरपालिकेने माजगाव, चराठा या गावांना तुम्ही स्वत:ची व्यवस्था करा. कारण वाढत्या शहरीकरणामुळे पाणी पुरवठा करणे भविष्यात शक्य होणार नसल्याचे कळवले होते.नगरपालिकेचा ग्रामपंचायतशी झालेला करारही केव्हाच संपला आहे. तरीही नगरपालिका या गावांना पाणी पुरवठा करत आहे.यातील कुणकेरी गावात सावंतवाडीला पाणी पुरवठा करणारे पाळणेकोंड धरण असल्याने कुणकेरीला कायम स्वरूपी ८० हजार लिटर पाणी देणे बंधनकारक आहे. ते आजही सुरूच आहे. मात्र, पालिका ग्रामस्थांच्या आग्रहाखातर १ लाख २० हजार लीटर पाणी सोडत होते. यातील ४० हजार लीटर पाणी हे अतिरिक्त होते. मात्र गुरुवारपासून ८० हजार लीटरच पाणी देण्यात येणार आहे.माजगावमधील घरे पाण्यापासून वंचितमाजगाव व चराठा या गावांना नगरपालिका पाणी सोडत होती. ते पाणी आता कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय सावंतवाडी नगर पालिकेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे माजगावमधील अनेक घरे पाण्यापासून वंचित राहणार आहे. माजगाव येथील पाणी पुरवठा बंद झाल्यानंतर माजगाव ग्रामस्थांनी नगराध्यक्ष संजू परब यांची भेट घेऊन पाणी सोडण्याबाबत विनंती केली. पण परब यांनी पाणी सोडण्यात येणार नसून, तुम्हाला टँकरने पाणी पुरवठा करू असे सांगितले. आमदार दीपक केसरकर यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्न असफल ठरल्याचे दिसून आले.
माजगाव,चराठ्याला नगरपालिकेकडून पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 2:04 PM
water shortage Sawatnawadi Sindudurg : गेल्या अनेक वर्षांपासून सावंतवाडी नगरपालिकेने माजगाव, चराठा या गावांना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या ग्रामपंचायत सोबतचा करार संपल्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेने अखेर पाणी पुरवठा करण्याचा निर्णय गुरूवारपासून थांबवला असून, कुणकेरीला पुरवठा होणारा अतिरिक्त पाणीसाठाही थांबविला आहे.
ठळक मुद्दे कुणकेरीलाही कराराप्रमाणे पाणी सावंतवाडीत पाणी पुरत नसल्याने घेतला निर्णय