शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

किनारपट्टीवर पाणीटंचाईचे चटके

By admin | Published: May 01, 2016 12:19 AM

पाणी विकत घेण्याची नामुष्की : तळाशीलवासीय 'घागर मोर्चा'च्या पवित्र्यात

सिद्धेश आचरेकर ल्ल मालवणसिंधुदुर्ग किनारपट्टीवर यंदाच्या वर्षी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता दुष्काळजन्य परिस्थिती एवढी नसली तरी किनारपट्टी भागातील ग्रामस्थांच्यात मात्र कोरड पडायला लावणारी आहे. गतवर्षी पाऊस कमी पडल्याने भूजल पातळीत घट झाल्याने मार्चपासून पाणीटंचाईचे चटके सहन करायची नामुष्की किनारपट्टीवासीयांवर ओढवली आहे. मालवण तालुक्यातील तळाशीलसह सर्जेकोट, देवबाग गावातील विहिरीत क्षारयुक्त पाणी मिळत आहे. गोड्या पाण्याच्या विहिरीत क्षारयुक्त पाणी मिळत असल्याने आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. मे महिन्यात खारट पाण्याची तीव्रता अधिक वाढणार असून यातून त्वचारोगासारखे आजार होण्याचीही शक्यता ग्रामस्थ वर्तवत आहेत. तालुक्यातील तळाशीलसह सर्जेकोट आणि देवबाग संगम या भागात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. तर जिल्हा प्रशासनाकडून येत्या आठ दिवसात तळाशील गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून न दिल्यास तळाशीलवासीय तहसील कार्यालयावर ‘घागर मोर्चा’ काढण्याच्या तयारीत आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांची समस्या ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी ग्रामस्थ करत आहे. दरम्यान, तोंडवली-तळाशील येथील खारट पाणीप्रश्नी आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेत टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची होत असलेली हेळसांड थांबबावी यादृष्टीने प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाही करण्यात येणे आवश्यक आहे. कारण सर्जेकोट येथील नागरिकांना दरदिवशी २०० प्रमाणे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तसेच तळाशील येथील पर्यटन व्यावसायिकांनाही पाणी विकत घेण्याची नामुष्की ओढवली आहे. सुमार पावसाचा किनारपट्टीला फटकागतवर्षी सरासरीपेक्षा सुमार पाऊस पडल्याने याचा सर्वाधिक फटका किनारपट्टी भागाला बसला आहे. किनारपट्टी भागातील विहिरीत भूजल पातळी घटली आहे. त्यात पाण्याचाही वापर वाढल्याने पाण्याची सरासरी पातळी घटली. त्यामुळे समुद्रातील खारट पाण्याचे स्त्रोत गोड्या पाण्यात मिश्रित होऊन पाण्याचे पाणी क्षारयुक्त बनले आहे. विहिरींच्या पाण्यात क्षारतेचे प्रमाण वाढल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्वचारोगासारखेही गंभीर आजार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पावासाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे काळाची गरज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. तळाशीलप्रमाणे देवबाग मोबार-संगम येथीलही विहिरीत क्षारयुक्त पाणी मिळत असल्याने त्यांना पाण्यासाठी दोन किमीची पायपीट करावी लागत आहे. वायरी, तारकर्लीसह दांडी किनारी तेवढे क्षारयुक्त पाणी मिळत नसल्याचे मच्छिमारांनी सांगितले.घागर मोर्चा काढणारतळाशील गावात खारट पाण्याने विहिरींवर राज्य केले असल्याने पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. दरवर्षी मे अखेरीस येथील विहिरीत क्षारयुक्त पाणी मिसळून खारट पाणी तयार होते. मात्र, गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने भूजल पातळी घटली. त्यामुळे गोड्या पाण्यात खारट पाणी मिश्रित व्हायला सुरुवात झाले. दरवर्षी मे अखेरीस मिश्रित होणारे हे पाणी यंदा मात्र फेब्रुवारीपासून सुरु झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या उभी राहिली आहे. क्षारयुक्त पाणीप्रश्नी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास आठवडाभरात तळाशील येथील सर्व ग्रामस्थ तहसील कार्यालयावर ‘घागर मोर्चा’ काढणार असल्याचा इशारा ग्रामस्थांच्यावतीने सरपंच संजय केळुसकर यांनी ‘लोकमत'शी बोलताना दिला आहे.