शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
2
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
5
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
6
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
7
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
8
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
9
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
10
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
11
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
12
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
13
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
14
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
15
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
16
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
17
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
18
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
19
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
20
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया

हनुमंतगड नष्ट होण्याच्या मार्गावर

By admin | Published: May 19, 2015 10:37 PM

शिवकालीन वारसा : शासनाच्या उदासीन धोरणामुळे अखेरच्या घटका

नीलेश मोरजकर- बांदा -शिवकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील कित्येक वास्तू आज शासनाच्या उदासीन धोरणामुळे अखेरच्या घटका मोजत आहेत. बांदा-तळकट राज्यमार्गापासून नजीकच असलेला फुकेरी गावातील शिवकालीन हनुमंतगड दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गावातील हा इतिहासकालीन ठेवा पुढील पिढीलाही समजावा, यासाठी गावकरी झटत आहेत. या गडाच्या स्मृती काही अवशेषांच्या माध्यमातून गडावर, गावात आजही सुस्थितीत आहेत. मात्र, गडाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी पुरातत्व खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे.दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या फुकेरी गावाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. सह्याद्रीच्या कुशीत सुमारे ५०० लोकवस्तीचा हा गाव वसलेला आहे. शिवकालीन हनुमंत गडामुळे या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. समुद्रसपाटीपासून ६५० मीटर उंचीवर या गडाची बांधणी करण्यात आली आहे. गड उंचावर असल्याने येथील वातावरण हवेशीर व आल्हाददायक असते. डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत येथील वातावरणात गारवा असतो.या गडावर हनुमंताचे पाषाण होते. यावरुनच त्याला ‘हनुमंतगड’ असे नाव पडले. कालांतराने हे पाषाण गावातील मंदिरात स्थानापन्न करण्यात आले. शिवकालीन असलेला या गडाचा इतिहास पुढील पिढीला समजावा, यासाठी इतिहासकालीन ठेवा जतन करणे गरजेचे आहे. यासाठी फुकेरीवासीयांनी पुढाकार घेण्याचे निश्चित केले आहे. शासनाला जाग आणण्यासाठी लवकरच गडाच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.हनुमंत गडाविषयीसमुद्रसपाटीपासून ६५० मीटर उंचीवर सुमारे २००० फूट उंचीवर सह्याद्रीच्या डोंगररांगात २६ एकर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रात या गडाची उभारणी करण्यात आली आहे. हा भाग अतिशय दुर्गम असून गडावरून सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांचा काही भाग व थेट गोव्यापर्यंतचा प्रदेश नजरेस पडतो. शत्रुला चढाई करण्यासाठी अत्यंत कठीण असलेल्या या गडाचा वापर शिवकाळात टेहळणीसाठी करण्यात येई. गडाच्या एका बाजूने कोल्हापूर जिल्ह्याचा काही भाग देखील दृष्टीस पडतो. पश्चिम घाटातून कोकण प्रदेशात संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी पारगडावरुन येथे सांडणीस्वारामार्फत संदेश पाठविण्याचे काम करण्यात येई. त्यामुळे शिवकाळात या गडाचे महत्त्व अनन्यसाधारण होते. गडाचे क्षेत्र विस्तीर्ण असल्याने शत्रुला या गडावर हल्ला करुन ताबा मिळविणे कठीण होते.हनुमंत गडाच्या अधिपत्याखाली गडघेरा म्हणून असनिये, घारपी, झोळंबे हे तीन गाव येतात. गडाची तटबंदी पुरातन असून गडाचा मुख्य दरवाजा पश्चिमेला आहे. मात्र, सद्य:स्थितीत गडाची तटबंदी व दरवाजा पूर्णपणे ढासळला आहे.शिवकाळात शिवाजी महाराजांनी हा गड आपल्या ताब्यात घेऊन या किल्ल्यावर ३६0 गावातील शूर सैनिकांची गडकरी म्हणून नेमणूक केली होती. पुढे मोगलांनी हा गड खालसा केल्यावर हे गडकरी वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेले. त्यापैकी पेंढूरकर भोसले-सावंत, मसुरकर सावंत, कुणकेरकर सावंत ठिकार, कोलते व पोकळे असे एकूण सहा गडकरी वंशज आजतागायत या परिसरात राहतात.श्री देव पाटेकर यांची एक तनु श्री देव नितकारी गडावर एका कमंडलुच्या स्वरुपात अस्तित्वात होती. तीची मालकी व पूजापाठ गडकरी करत. हनुमंत गडावरील नितकारी जो राज्याचा रक्षक त्याबद्दल आजही राजघराण्यात आस्था असून राजघराण्याकडून देण्यात आलेली चांदीच्या घोड्यावरील नितकारीची मूर्ती आजही गावातील मंदिरात पूजेसाठी ठेवलेली आहे. गडावरील मुख्य चाळ्याचे देवस्थान श्री देवी पिसादेवीची वार्षिक गड ओवाळणी येथील गावकरी सालाबादप्रमाणे करतात. रथसप्तमीला वार्षिक कार्यक्रम येथे होतात. गडावर या पिसादेवीचे स्थान आहे. गडावर प्राचीन गोड्या पाण्याची तळी देखिल आहे.गडाच्या पूर्वेस चौकुळ, उत्तरेस घारपी, पश्चिमेस असनिये तर दक्षिणेस खडपडे, कुंभवडे या गावांच्या सीमा येतात. हनुमंतगड पूर्णपणे ढासळला असून केवळ गडाचे काही अवशेष शिल्लक आहेत. गडावर २ तोफा असून गडाच्या पायथ्याशी गावात २ लोखंडी तोफा आहेत. गडावरील तत्कालीन न्यायसभेच्या जागेची दुरवस्था झाली आहे. गडावर झुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गडावर जाताना झाडाझुडपातून वाट काढावी लागते. या गडाबाबत राजाराम आईर, अमित गवस, सुभाष आईर यांनी माहिती दिली.फुकेरी येथील ऐतिहासिक हनुमंत गडाची दुरवस्था झाली असून, स्थानिकांनी याबाबत वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र प्रत्येकवेळी शासनाने दुर्लक्ष केल्याने या गडाच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. पुरातत्व खात्याकडेही पाठपुरावा करण्यात येणार आहे. या गडाचा विकास केल्यास याचा फायदा फुकेरी गावाबरोबरच परिसरालाही होणार आहे.- राजाराम आईर, ग्रामस्थ फुकेरी