कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एका आमदाराला हाफ मर्डरच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. तो आमदार अप्पासाहेब पटवर्धन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कणकवलीच्या भुमीतील आहे. आम्ही एका गुंडप्रवृत्तीच्या आमदाराला निवडून दिले आहे. त्यामुळे चुकीचे प्रायश्चित घेण्याच्या दृष्टीने लोकांच्यावतीने संदेश पारकर यांनी आत्मक्लेश आंदोलन केले.कणकवली तालुक्यातील वागदे, गोपुरी आश्रम येथील अप्पासाहेब पटवर्धन यांच्या पुतळ्यासमोर शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. आज, शुक्रवारी सकाळी १० वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत पारकर यांनी हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केले होते. यावेळी शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रमोद कावले, रूपेश नार्वेकर, निलम पालव-सावंत, संतोष परब, कन्हैया पारकर, हर्षद गावडे, आनंद ठाकूर , शेखर राणे, रुपेश आमडोसकर, ललीत घाडीगांवकर, बंडू चव्हाण , संजय पारकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. आत्मक्लेशामागील भूमिकेसंबंधी पारकर म्हणाले, आमदार नितेश राणे यांच्यावर शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एका आमदाराला हाफ मर्डरच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. आम्ही एका गुंडप्रवृत्तीच्या आमदाराला निवडुन दिले आहे. त्यामुळे चुकीचे प्रायश्चित घेण्याच्या दृष्टीने हे आंदोलन केल्याचे पारकर यांनी सांगितले.
आम्ही एका गुंडप्रवृत्तीच्या आमदाराला निवडून दिले, संदेश पारकरांचे आत्मक्लेश आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 6:59 PM