कणकवलीः नारायण राणेंचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सी-वर्ल्डचं येत्या दोन वर्षांत काम सुरू करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. लवकरच चिपी विमानतळ सुरू होणार असून, सत्तेवर आल्यानंतर सिंधुदुर्गात मंत्रिमंडळाची बैठक घेऊ. कोकणातील वाहून जाणारे पाणी अडवून कोकण टँकरमुक्त करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी कोकणवासीयांना दिलं आहे. कणकवलीतल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, यासाठी २०२२पर्यंत प्रयत्नशील राहणार आहे. कोकणात पर्यटनाचा महामार्ग असणार आहे, पाच वर्षांत 30 हजार किलोमीटर रस्ते तयार केले. पाच वर्षांत जी कामं केली त्याचा हिशेब द्यायला तयार आहे. 15 वर्षांत तुम्ही काय केले होते, त्याच्या तिप्पट पाच वर्षांत केले, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात थेट पैसे जमा केलेले आहेत. कोकणात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणार आहे. जेणेकरून सिंधुदुर्गातील तरुणांना नोकरीसाठी मुंबईत जावे लागणार नाही. सिंधुदुर्ग मोठ्या प्रमाणावर काम केले असून, पर्यटनाचे केंद्र व्हावे म्हणून फाईव्ह स्टार हॉटेल सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
Maharashtra Election 2019 : सी वर्ल्ड प्रकल्प अन् चिपी विमानतळ लवकरच सुरू करू- देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 3:10 PM