वैभववाडी : वैभववाडी-तळेरे मार्गावर नाधवडे येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. अपघातग्रस्त वाहनांमध्ये दोन कार आणि एका पोलीस व्हॅनचा समावेश आहे.शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास नाधवडे येथे एका कारने (एम. एच. ४१; सी-४१५८) शिडवणे फाट्याकडे वळण्यासाठी इंडिकेटर चालू केला. परंतु कार पूर्णपणे न वळता रस्त्याच्या मध्यभागी थांबली.त्यामुळे मागून आलेल्या दुसऱ्या कारची (एम. एच. १४; सीके-९६६७) रस्त्याच्या मधोमध थांबलेल्या पहिल्या कारला मागील चाकाजवळधडक बसली. त्याचवेळी पुण्याहून पोलीस व्हॅन ओरोसकडे निघाली होती. रस्त्याच्या मधोमध दोन वाहने थांबल्याचे लक्षात येताच चालकाने व्हॅनचा ब्रेक दाबला. परंतु, पोलीस व्हॅन न थांबता रस्त्यात थांबलेल्या कारला धडकली.या तिहेरी अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. या अपघाताची पोलिसांत नोंद झाली असून पोलीस नाईक बाबासाहेब चौगले तपास याबाबत अधिक करीत आहेत.
वैभववाडी-तळेरे मार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:38 IST
वैभववाडी-तळेरे मार्गावर नाधवडे येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. अपघातग्रस्त वाहनांमध्ये दोन कार आणि एका पोलीस व्हॅनचा समावेश आहे.
वैभववाडी-तळेरे मार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात
ठळक मुद्देवैभववाडी-तळेरे मार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघातनाधवडे येथील घटना, पोलीस वाहनाचा अपघातात समावेश