कणकवली : भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे नवनियुक्त सचिव माजी खासदार निलेश राणे यांचे कणकवली येथील श्रीधर नाईक चौक येथे गुरुवारी जल्लोषी स्वागत करण्यात आले. 'निलेश राणे आगे बढो, हम आपके साथ है' अशा घोषणांनी तसेच ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीने सर्व परीसर दुमदुमून गेला होता.यावेळी भाजपचे पदाधिकारी व शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, भाग्यलक्ष्मी साटम, तालुकाध्यक्ष संतोष कानडे,बाबू गायकवाड, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री, नगरसेवक अभिजित मुसळे, बंडू गांगण , मेघा गांगण , किशोर राणे, संजय कामतेकर, शिशिर परुळेकर, विराज भोसले, प्रकाश पारकर, गणेश तळगावकर, सोनू सावंत, अण्णा कोदे , रमाकांत सापळे व बहुसंख्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कणकवलीत निलेश राणे यांचे जल्लोषी स्वागत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 12:12 IST
Nilesh Rane Bjp Kankavli Sindhudurg- भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे नवनियुक्त सचिव माजी खासदार निलेश राणे यांचे कणकवली येथील श्रीधर नाईक चौक येथे गुरुवारी जल्लोषी स्वागत करण्यात आले.
कणकवलीत निलेश राणे यांचे जल्लोषी स्वागत !
ठळक मुद्देकणकवलीत निलेश राणे यांचे जल्लोषी स्वागत ! भाजप कार्यकत्यांमध्ये उत्साह; जोरदार घोषणाबाजी