सिद्धेश आचरेकरमालवण : लॉकडाऊन अखेर सुरू झाले. वीकेंड लॉकडाऊनला नागरिकांनी अनपेक्षित प्रतिसाद दिला. मात्र, दोन दिवसांनी राज्य शासनाने बुधवारी रात्रीपासून जारी केलेल्या लॉकडाऊनचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे पहायला मिळत आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सर्रास आस्थापने सुरू असल्याने बंदोबस्तासाठी नेमलेल्या पोलिसांचे हात दगडाखाली आहेत. ह्यया ना त्याह्ण कारणांनी लोक घराबाहेर पडत लॉकडाऊनच्या आदेशाला हरताळ फासत आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट उधाणासारखी उसळली आहे. प्रत्येक तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी चिंता वाढविणारी आहे. कोरोनाची दुसरी लाट भयावह असताना लोक बिनधास्त फिरत आहे. कोरोनाची लागण वयोवृद्ध व्यक्तींना होते असा समज होता; मात्र सर्व वयोगटांना कोरोनाने कवेत घेतले आहे.मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे धोरण आखले. त्यासाठी पोलीस यंत्रणाही जीव धोक्यात घालून मैदानात उतरली. मात्र, प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक आस्थापनाना मुभा देण्यात आल्याने विनाकारण फिरणाऱ्या लोकांचे चांगलेच फावले आहे. दूध आणायला जातो, बेकरीत जातो, भाजी आणायला जातो, मासे आणायला जातो, यासारखे अनेक कारणे लोक पुढे करून पोलिसांना चुना लावून मुक्तसंचार करताना गुरुवारी दिसून आले.कारवाई कशी करायची?पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे धोरण आखले खरे, मात्र बंदोबस्तासाठी नेमलेल्या पोलिसांना नेमकी कोणती आणि कशी कारवाई करावी हा मोठा प्रश्न पडला आहे. अनेक आस्थापना प्रशासनाने सुरू ठेवल्याने लोक तशी कारणे पुढे करतात आणि निघून जातात. अशा लोकांना माघारी परतून लावले तर वादंग होतात. शिवाय कोणती कारवाई करावी, याबाबतही स्पष्टता नसल्याने पोलिसांचे हात दगडाखाली सापडले आहेत.संचारबंदीची जबाबदारी फक्त पोलिसांवरच?पोलिसांनी दिवस-रात्र बंदोबस्त करायचा. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करायची. अतिशहाण्या माणसांशी वाद करायचे. हे सर्व पोलीस प्रशासन करताना दिसते. अन्य प्रशासनाची पोलिसांना साथ मिळत नाही. पोलीस यंत्रणेला प्रशासनाची साथ लाभल्यास लॉकडाऊनची अंमलबजावणी आणखी कठोरपणे राबविता येईल.
कसली संचारबंदी अन् कसलं लॉकडाऊन?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 6:39 PM
LockDaown Malvan Sindhudurg : लॉकडाऊन अखेर सुरू झाले. वीकेंड लॉकडाऊनला नागरिकांनी अनपेक्षित प्रतिसाद दिला. मात्र, दोन दिवसांनी राज्य शासनाने बुधवारी रात्रीपासून जारी केलेल्या लॉकडाऊनचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे पहायला मिळत आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सर्रास आस्थापने सुरू असल्याने बंदोबस्तासाठी नेमलेल्या पोलिसांचे हात दगडाखाली आहेत. ह्यया ना त्याह्ण कारणांनी लोक घराबाहेर पडत लॉकडाऊनच्या आदेशाला हरताळ फासत आहेत.
ठळक मुद्देकसली संचारबंदी अन् कसलं लॉकडाऊन?