रजनीकांत कदम -कुडाळ तालुक्यातील कर्ली नदी किनाऱ्यालगतच्या गावामध्ये स्वाईन फ्लूमुळे दोन बालकांचा मृत्यू झाला. तसेच अनेक लहान बालके तापजनक रोगाने आजारी आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या गावामध्ये स्वाईन फ्लू येथील वाळू पट्ट्यात काम करणाऱ्या परप्रांतीयांमुळे आला की अन्य कोणामुळे आला, हे आरोग्य खात्यासह प्रशासनाला आवाहन बनून आहे.कुडाळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोणत्या आजाराची साथ पसरली नव्हती. मात्र, या तालुक्यातून वाहणाऱ्या कर्ली नदी किनाऱ्यालगतचे नेरुर, सोनवडे, सरंबळ या गावांमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात तापसरीचे रुग्ण आढळू लागले. या रुग्णामध्ये ० ते १५ वयोगटातील बालकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आरोग्य विभाग मात्र सुरुवातीला येथील तापसरीबाबत अनभिज्ञच राहिले. या तापसरीचा पहिला बळी २० आॅगस्ट रोजी नेरुरपार येथील अडीच वर्षीय सानवी नाईक या मुलीच्या रुपाने ठरला. मृत्यू स्वाईन फ्लूमुळे झाला असे रिपोर्ट मणीपाल येथील स्वाईन फ्लू तपासणी करणाऱ्या सरकारमान्य केंद्राने दिला तरी येथील आरोग्य यंत्रणा जागी झाली नाही. ती फक्त तारखेच्या घोळात व इथे स्वाईन फ्लू कसा येऊ शकतो याबबत चर्चा करीत राहिली. सानवी नाईकचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला असा रिपोर्ट आल्यावर आरोग्य विभागाने या ठिकाणी तत्काळ आरोग्य तपासणी करणारी पथके नेमली पाहिजे होती. मात्र, त्यावेळीही आरोग्य प्रशासन निद्रावस्थेतच होते. त्यानंतर २९ आॅगस्टला नेरुर बांदेकरवाडी येथील वैभवी ताटे हिचा मृत्यूही ताप आल्याने कणकवली येथे उपचारादरम्यान झाला. वैभवी ताटेच्या मृत्यूनंतर मात्र आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले व त्यानंतर या गावामध्ये तपासणी करणाऱ्या पथकाची नेमणूक सुरू केली. मात्र यावेळी वेळ निघून गेली होती. दरम्यान या तापसरीमध्ये सोनवडे येथील अडीच वर्षीय निकेतन धुरी या बालकाचा मृत्यू झाला. आता या सर्वांचे रिपोर्ट पाहता यातील दोन मुलांचे स्वाईन फ्लूमुळे निधन झाले असल्याने या ठिकाणी स्वाईन फ्लू कसा येऊ शकतो, दुसराच ताप असेल असे सांगणारा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला व त्यांची धावपळ उडाली. एवढे सर्व झाल्यावर जर काही मुले व त्यांचे कुटुंब गेल्या काही महिन्यात बाहेर गावी गेले नसतील, तसेच सुंदर हिरवाईने नटलेल्या या गावामध्ये स्वाईन फ्लू विषाणू आला कुठून व तो या लहान मुलांनाच कसा झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.लागण कोणामुळे ?स्वाईन फ्लू : आरोग्य खात्यासह प्रशासनासमोर आव्हानरजनीकांत कदम ल्ल कुडाळकुडाळ तालुक्यातील कर्ली नदी किनाऱ्यालगतच्या गावामध्ये स्वाईन फ्लूमुळे दोन बालकांचा मृत्यू झाला. तसेच अनेक लहान बालके तापजनक रोगाने आजारी आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या गावामध्ये स्वाईन फ्लू येथील वाळू पट्ट्यात काम करणाऱ्या परप्रांतीयांमुळे आला की अन्य कोणामुळे आला, हे आरोग्य खात्यासह प्रशासनाला आवाहन बनून आहे.कुडाळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोणत्या आजाराची साथ पसरली नव्हती. मात्र, या तालुक्यातून वाहणाऱ्या कर्ली नदी किनाऱ्यालगतचे नेरुर, सोनवडे, सरंबळ या गावांमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात तापसरीचे रुग्ण आढळू लागले. या रुग्णामध्ये ० ते १५ वयोगटातील बालकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आरोग्य विभाग मात्र सुरुवातीला येथील तापसरीबाबत अनभिज्ञच राहिले. या तापसरीचा पहिला बळी २० आॅगस्ट रोजी नेरुरपार येथील अडीच वर्षीय सानवी नाईक या मुलीच्या रुपाने ठरला. मृत्यू स्वाईन फ्लूमुळे झाला असे रिपोर्ट मणीपाल येथील स्वाईन फ्लू तपासणी करणाऱ्या सरकारमान्य केंद्राने दिला तरी येथील आरोग्य यंत्रणा जागी झाली नाही. ती फक्त तारखेच्या घोळात व इथे स्वाईन फ्लू कसा येऊ शकतो याबबत चर्चा करीत राहिली. सानवी नाईकचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला असा रिपोर्ट आल्यावर आरोग्य विभागाने या ठिकाणी तत्काळ आरोग्य तपासणी करणारी पथके नेमली पाहिजे होती. मात्र, त्यावेळीही आरोग्य प्रशासन निद्रावस्थेतच होते. त्यानंतर २९ आॅगस्टला नेरुर बांदेकरवाडी येथील वैभवी ताटे हिचा मृत्यूही ताप आल्याने कणकवली येथे उपचारादरम्यान झाला. वैभवी ताटेच्या मृत्यूनंतर मात्र आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले व त्यानंतर या गावामध्ये तपासणी करणाऱ्या पथकाची नेमणूक सुरू केली. मात्र यावेळी वेळ निघून गेली होती. दरम्यान या तापसरीमध्ये सोनवडे येथील अडीच वर्षीय निकेतन धुरी या बालकाचा मृत्यू झाला. आता या सर्वांचे रिपोर्ट पाहता यातील दोन मुलांचे स्वाईन फ्लूमुळे निधन झाले असल्याने या ठिकाणी स्वाईन फ्लू कसा येऊ शकतो, दुसराच ताप असेल असे सांगणारा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला व त्यांची धावपळ उडाली. एवढे सर्व झाल्यावर जर काही मुले व त्यांचे कुटुंब गेल्या काही महिन्यात बाहेर गावी गेले नसतील, तसेच सुंदर हिरवाईने नटलेल्या या गावामध्ये स्वाईन फ्लू विषाणू आला कुठून व तो या लहान मुलांनाच कसा झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.स्वाईन फ्लू विषाणूजन्य आजार : प्रदीप आवटेदोन टीम दाखल : पुणे येथील पथकाकडून संशोधन सिंधुदुर्गनगरी : स्वाईन फ्लू हा विषाणूजन्य आजार कोणालाही होऊ शकतो. आता तो सिंधुदुर्गच्या हवामानाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. तो कसा होईल याला शास्त्रीय आधार नाही. म्हणूनच जिल्हावासियांनी याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे, असे मत स्वाईन फ्लू सर्वेक्षण पथकाचे राज्य प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केले. जिल्ह्यात सध्या तापाचे ७६ रुग्ण आहेत. मात्र, त्यामध्ये स्वाईन फ्लूसदृश काही रुग्ण आहेत. त्या सर्वांवर उपचार चालू आहेत अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.स्वाईन फ्लूने दोन बालकांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यात स्वाईन फ्लू सर्वेक्षण व संशोधनासाठी एक पथक पुणे येथील राष्ट्रीय विषाणूजन्य संस्था व बी. जे. मेडिकल कॉलेज येथून जिल्ह्यात दाखल झाले. दोन दिवसांच्या सर्वेक्षणानंतर ते गुरुवारी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, राष्ट्रीय विषाणू संस्थेचे संशोधक डॉ. अविनाश देवशेटवार, बी. जे. मेडिकल कॉलेजचे बालरोगशास्त्रज्ञ डॉ. राजेश कुलकर्णी, फिजिशियन डॉ. नागनाथ टेगेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन बिलोलीकर, कोल्हापूरचे आरोग्य उपसंचालक आर. बी. मुगडे उपस्थित होते. सिंधुदुर्गात दोन दिवस सर्वेक्षण केल्यावर स्वाईन फ्लू संदर्भात जनतेला माहिती देण्यासाठी डॉ. प्रदीप आवटे बोलत होते. स्वाईन फ्लू हा तसा सौम्य आजार आहे. मात्र त्याबाबत भितीचे वातावरण निर्माण झाले असे स्पष्ट करत डॉ. आवटे म्हणाले की, कणकवली, ओरोस, कुडाळ येथे रुग्णांची पाहणी केली. वास्तविक स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण २००९ मध्ये मेक्सिकोमध्ये आढळून आला. मात्र त्यानंतर अडीच महिन्यातच भारतात स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळला. यावरून या रोगाचा फैलाव हवेवाटे जोरात होऊ शकतो. म्हणूनच यासाठी जास्तीत जास्त दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच स्वाईन फ्लूचे विषाणू सर्वसामान्य माणसातही आढळू शकतात. फक्त त्यांची प्रतिकारशक्ती जास्त असल्यास त्याचा परिणाम होत नाही पण प्रतिकारशक्ती कमी असल्यास त्याचा परिणाम लगेच होऊ शकतो म्हणूनच ६ वर्षांच्या आतील बालके, वृद्ध माणसे, श्वसनाचा विकार असलेले, मधुमेह, उच्च रक्तदाब व गरोदर स्त्रियांना याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणूनच त्यांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल ठेवणे व फ्लूूसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
लागण कोणामुळे ?
By admin | Published: September 03, 2015 11:24 PM