शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने कोणाला पडत होती?

By admin | Published: June 10, 2016 11:42 PM

वैभव नाईक यांचा प्रतिटोला : रेडी बंदराबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

कणकवली : पालकमंत्रीपदासाठी आम्ही नारायण राणे यांचा वापर करतो, अशी टीका करणाऱ्या आमदार नीतेश राणे यांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने कोणाला पडत होती आणि आज त्यांची काय अवस्था आहे, याचा विचार करावा, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. आमदार नीतेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यांचा त्यांनी येथील विजय भवनात आयोजित पत्रकार परिषदेत समाचार घेतला. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, अ‍ॅड.हर्षद गावडे, नगरसेवक सुशांत नाईक उपस्थित होते. वैभव नाईक म्हणाले की, आठ वर्षांपूर्वी शिवसेना औषधालाही शिल्लक ठेवणार नाही अशी वल्गना नारायण राणेंनी केली होती. मात्र, मी जिल्हाप्रमुख असताना शिवसैनिकांनी दोन आमदार आणि एक खासदार निवडून आणला. नीतेश राणे जिल्ह्यात कॉँग्रेसचे नेतृत्व करायला लागल्यानंतर कॉँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे.रेडी बंदराच्या माध्यमातून विकासकाने शासनाची लूट केली आहे. त्यामुळे रेडी बंदर विकासाकडून काढून घ्यावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. सन २००९ सालापासून आतापर्यंत १ कोटी १ लाख ३५ हजार ५३० टन एवढे खनिज रेडी बंदरातून निर्यात झाले आहे. यासाठी हाताळणी शुल्क म्हणून प्रतिटन २५० रूपये कंपनीकडून घेण्यात आले. आतापर्यंत रेडी बंदर विकासकाने खर्च वजा जाता सुमारे १८० कोटी रूपयांचा नफा मिळवला. याबाबत तक्रारीनंतर बंदर विकासकाने न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घातल्याचे नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)गडकरींच्या मदतीने जास्तीत जास्त मोबदला देणारनारायण राणे यांच्याशिवाय आपली ओळख काय आहे, हे आमदार नीतेश राणे यांनी कॉँग्रेस कार्यकर्त्यांनाच विचारून घ्यावे. महामार्गासाठी २० पट मोबदला मिळालाच पाहिजे, अशी मागणी करणाऱ्या नीतेश राणे यांनी जमिन मोजणी होऊ देणार नाही, असा पवित्राही घेतला होता. मात्र, जमिन मोजणी पूर्णही झाली आहे आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागे खासदार विनायक राऊत उभे असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मदतीने जास्तीत जास्त मोबदला दिला जाणार आहे. - वैभव नाईक, आमदार, शिवसेना