कणकवली : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी १० कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यानी जाहीर केला आहे.यातील उर्वरित निधीचे वाटप काही दिवसात केले जाईल. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत .गौण खनिज उत्खनन सुरू करण्याच्याबाबतीतही निर्णय झाला असून शासकीय इमारत बांधकाम, मच्छीमारासाठी विशेष अशा सोई सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना भरपाई देणार असल्याचे आश्वासन महसूल,ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.कणकवली येथे शनिवारी सायंकाळी मंत्री अब्दुल सत्तार यांचे आगमन झाले.यावेळी विजय भवन येथे खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते संदेश पारकर , जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत तसेच जिल्हाप्रमुख संजय पडते आदी नेत्यांसह शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले. ' शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो ' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.मंत्री अब्दुल सत्तार हे शनिवार व रविवार या दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.या दौऱ्यात विविध नियोजित कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.तसेच अधिकाऱ्यांसमवेत विकासकामांचा आढावा घेणार आहेत.कणकवलीत ते दाखल झाल्यानंतर कणकवलीत विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत पक्षवाढी सोबतच शिवसेना बळकटीसाठी तसेच जिल्हयातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यकर्त्याच्या तसेच नागरिकांच्या प्रश्नाबाबत निवेदन स्वीकारत पाठ पुराव्याचे आश्वासन दिले.यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले,प्रथमेश सावंत, नागेंद्र परब, देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर, नगरसेवक कन्हैया पारकर, सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव,वैदेही गुडेकर,मिलन तळगावकर,माधुरी दळवी सचिन सावंत,अँड हर्षद गावडे,संदेश पटेल,राजू राठोड,सतीश नाईक,भास्कर राणे, सचिन सावंत,रामू विखाळे, सुनील पारकर,ललित घाडीगावकर,सिद्धेश राणे,तेजस राणे,निसार शेख,विलास गुडेकर,रोहित राणे,सरपंच प्रमोद कावले,सुदाम तेली आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.चिरेखाण बंदी सरकारने उठवली !सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरीकांना घर बांधणीसाठी जांभा चिरा आवश्यक असल्याने चिराबंदी उठवण्यात आली आहे. पूर्वीप्रमाणेच छोट्या लिज धारकांना परवानगी देण्यात येणार आहे.जिल्ह्यातील वन्यसंज्ञा,आकारीपड व प्रलंबित महसूल प्रश्न मार्गी लावण्यात येतील.शासनाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनाचा आढावा या दौर्यात घेण्यात येणार आहे. कोकणातील निसर्ग सौंदर्य सुंदर आहे . त्यामुळे कोकणातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. संघटनात्मक बांधणी करतानाच जिल्ह्यातील प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेत आहेत. असे मंत्री अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.