कणकवली : नारायण राणे यांनी करपलेली भाकरी योग्यवेळी पलटल्याने जिल्हा बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, वैभववाडी, दोडामार्ग व नुकतीच झालेल्या कुडाळ नगरपंचायतीमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. कुजलेले काही आंबे आमच्यापासून लोकांना दूर ठेवत होते. त्यांना राणेंनी बाजूला केल्यामुळे यशस्वी होवू शकलो. ही जिल्ह्यातील यशस्वी घोडदौड कायम ठेवणार असल्याचा विश्वास आमदार नीतेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.नीतेश राणे म्हणाले, कुडाळ नगरपंचायत निकाल काँग्रेस आघाडीच्या बाजूने लागला. हे निव्वळ राणेसाहेबांचेच यश आहे. त्यांनी घेतलेली मेहनत आणि बसविलेल्या नियोजनामुळे सत्तेमध्ये नसतानाही आणि आतापर्यंत काँग्रेसच्या विरोधात असलेले कुडाळ शहरवासीयांनी आम्हाला चांगला कौल दिला आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानणे गरजेचे आहे. त्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणार आहे. कुडाळवासीयांना दोन वर्षातच आपली चूक समजल्यामुळे त्यांनी राणेसाहेबांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखविला आहे.विधीमंडळामध्ये कोकण आणि मुंबईबाबत चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना कोकणासाठी स्वतंत्र महामंडळ आणि करोडोंचे पॅकेज जाहीर केले. सर्व दैनिकांनी याच्या हेडलाईन केल्या. मात्र, या सरकारने विश्वासार्हता एवढी गमावली आहे की, या घोषणेनंतरही मुख्यमंत्र्यांना टाहो फोडून भाषणबाजी करूनही कुडाळमधील एकच नगरसेवक निवडून आला. त्यामुळे सरकारच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तुम्ही जर एवढा निधी आणला तर येथील जनता एकहाती तुमच्याकडे सत्ता देणे अपेक्षीत होते. तुमच्या फुगविलेल्या आकडेवारीवर जनतेचा विश्वासच राहिलेला नाही. आधी याबाबत विचार करा, असा टोलाही नीतेश राणे यांनी लगावला.या पत्रकार परिषदेदरम्यान, राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, तसेच काँग्रेस सोडून शिवसेनेत आणि भाजपमध्ये गेलेल्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार हल्ला चढविला. (विशेष प्रतिनिधी)दानवेंचे आभार : प्रमोद जठारांमुळे भाजपला सिंधुदुर्गात ‘अच्छे दिन’भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रमोद जठार यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली. त्याबद्दल मी रावसाहेब दानवेंचे आभार मानतो. मोदी लाट असताना आणि मोदींची जाहीर प्रचारसभा घेऊन जी व्यक्ती २५ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभूत होते. मतदारांमध्ये विश्वास निर्माण करू शकली नाही, ती व्यक्ती संघटना काय बांधणार ? भाजप पक्ष कसा काय उभा करणार. मात्र, असे असतानाही जठार जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर कुडाळमध्ये त्यांना कळून चुकले आहे की, आपली कुवत काय आहे? जठार यांची वयाची पन्नाशी झाली तरी अजून त्यांची बौद्धीक प्रगती झाली नसल्याचा आरोप राणेंनी केला.जनतेशी बांधील असल्याने प्रश्न विचारणारपोलिस अधीक्षकांचे स्वागतजिल्हा पोलिस अधीक्षकांचे मी स्वागत करतो. त्यांच्या बदलीची अगर कारवाईची मागणी काँग्रेसने कधीच केली नव्हती. याउलट ज्यांनी केली होती ते आता उलटे पडले आहेत. आपण डंपर राड्याबाबतचा प्रश्न विधानसभेत मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविले.
यशस्वी घोडदौड कायम ठेवणार
By admin | Published: April 22, 2016 11:37 PM