कुडाळ : माजी खासदार व सिंधुदुर्गचे सुपुत्र एकनाथ ठाकूर यांच्या नावाचा स्मृती पुरस्कार मला मिळाला हा माझ्या जीवनातील अत्यंत आनंदाचा क्षण असून, जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत रुग्णांची सदैव सेवा करीत राहणार आहे, असे प्रतिपादन जे. जे. रुग्णालय मुंबईचे अधिष्ठाता तथा ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी कुडाळ येथे केले. कुडाळ येथे लहाने यांना एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता बॅ. नाथ पै शैक्षणिक भवन एमआयडीसी कुडाळ येथे मुंबई येथील कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार सोहळा २०१७ चे आयोजन करण्यात आले होते.एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्काराचे यंदापासून आयोजन करण्यात आले असून, पहिलाच पुरस्कार डॉ. तात्याराव लहाने यांना देण्यात आला. अनुराधा ठाकूर व खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने गौरविले.या सोहळ््याचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, डॉ. तात्याराव लहाने, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, अनुराधा ठाकूर, माई माळगावकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे सल्लागार कुमार कदम, जे. जे. रुग्णालय नेत्रचिकित्सा विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले, डॉ. अमेय देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते.अनुराधा ठाकूर तसेच इतर मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त केली. या पुरस्कार सोहळ््यानंतर ज्येष्ठ पत्रकार देवदास मटाले यांनी डॉ. लहाने यांची प्रकट मुलाखत घेऊन त्यांचा जीवनपट उलगडला.या सोहळ््याला जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र्र परब, रंगभूषाकार विलास कुडाळकर, का. आ. सामंत, चंदू शिरसाट, सोनल खानोलकर, सुरेश राऊळ, सुनील सौदागर, अवधूत गवाणकर विविध क्षेत्रातील व्यक्ती, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. प्रफुल्ल वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)डॉ. लहाने हे देवदूतच : राऊतयावेळी खासदार राऊत म्हणाले, हा पुरस्कार सोहळा म्हणजे बॅ. नाथ पै, एकनाथ ठाकूर व डॉ. तात्याराव लहाने या तीन व्यक्तींच्या विचारांचा त्रिवेणी संगम आहे. दृष्टिहीन लोकांच्या जीवनातील अन्याय दूर करण्याचे गेली अनेक वर्षे कार्य करणाऱ्या डॉ. लहाने यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वीच देवदूत ही उपाधी देऊन गौरविले होते. एवढे त्यांचे कार्य महान असल्याचे त्यांनी सांगितले.नाथ पै संस्थेत नेहमीचसामाजिक उपक्रमउमेश गाळवणकर यांनी, सिंधुुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण व शैक्षणिक विकास व्हावा यासाठी एकनाथ ठाकूर हे सदैव कार्यरत होते. त्यांनीच ही बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सुरू केली असून, या शैक्षणिक संस्थेमधून नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातील, असे सांगितले.
शेवटच्या क्षणापर्यंत सेवा करणार
By admin | Published: April 10, 2017 9:42 PM