महेश सरनाईकसिंधुदुर्ग : गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात दक्षिणेकडून उत्तरेकडे सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात त्याचा मच्छिमारी व्यवसायावर परिणाम होत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री कडक्याची थंडी यामुळे साथीचे रोग बळावण्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
गेले दोन दिवस जिल्ह्यात दिवसभर तुफानी वारे वाहत आहेत. साधारणपणे दरवर्षी महाशिवरात्रीच्या दरम्यान असे वारे वाहतात. मात्र यावर्षी एक महिना अगोदरच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.आठवडा बाजाराला फटकासिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या कणकवली शहरात मंगळवारी आठवडा बाजार भरतो. वादळी वाऱ्यांचा फटका बाजारात बसणाऱ्या व्यापाऱ्यांना बसला. या व्यापाऱ्यांनी उभारलेले तंबू या वादळरूपी वाऱ्याने उडून जात होते. त्यामुळे उडालेले तंबू पुन्हा उभारताना त्यांच्या नाकीदम येत होते.पर्यटकांची किनारपट्टीवर तोबा गर्दीएअर एंडिंग, नाताळची सुट्टी, थर्टी फस्टची धूम अशा मौज मस्तीसाठी सध्या सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पर्यटकांची तोबा गर्दी पहायला मिळत आहे. देवगड, मालवण व वेंगुर्ले किनारपट्टीनजिक सर्व हॉटेलचे आगाऊ बुकिंग झाले आहेत.आंबा हंगाम लांबणीवरओखी वादळामुळे मागील आठवड्यात पडलेल्या पावसाने कोकण किनारपट्टीवरील आंबा हंगाम लांबणीवर पडणार आहे. पहिल्या टप्प्यात आलेला मोहोर पावसाने गळून पडल्याने आता पडत असलेल्या थंडीमुळे परत फळधारणा होण्याची प्रतीक्षा आंबा बागायतदारांना करावी लागणार आहे.