देवगड : उपरच्या वाऱ्यानंतर दक्षिण वाऱ्यांचा जोर वाढल्याने समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाली असून किनारपट्टीला महाकाय उंच लाटा धडकत असल्यामुळे भरतीच्यावेळी पाण्याची पातळी वाढली होती. समुद्रात घाळाघाळ निर्माण झाल्यामुळे मच्छिमारी व्यवसाय बंद ठेवण्यात आला.गेले दोन दिवस उपरच्या वाऱ्यांचा जोर होता. मात्र रविवारी सकाळपासून दक्षिण वाऱ्यांचा जोर वाढल्याने समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाली असून किनारपट्टी भागातही उंच लाटा धडकत असल्याने मच्छिमारांनी तत्काळ किनाऱ्यांवर काढलेल्या होड्या व जाळी सुरक्षितस्थळी हलविली.देवगड तालुक्यातील देवगड बिच समुद्रकिनारा, तांबळडेग, मिठमुंबरी, कुणकेश्वर, गिर्ये, पडवणे, मुणगे आदी समुद्रकिनारी महाकाय लाटा धडकत होत्या. यामुळे समुद्रकिनारी भागात भरतीच्या वेळी पाण्याची पातळी वाढली होती.वादळसदृश वातावरणामुळे समुद्रात घाळाघाळ निर्माण झाली असल्याने देवगड बंदरातील नौका समुद्रकिनारी मच्छिमारीसाठी गेल्या नाहीत. मच्छिमारीसाठी गेलेल्या काही नौकाही बंदरात परतल्या असून सध्या देवगड बंदरातील मच्छिमारी व्यवसाय बंद आहे.वादळसदृश वातावरण निवळले तरी समुद्रातील घाळाघाळ आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता मच्छिमार नेते भाई खोबरेकर यांनी व्यक्त केली. दक्षिण वाऱ्यांचा जोर वाढल्याने समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. देवगड किनारपट्टीला महाकाय उंच लाटा धडकत असल्यामुळे भरतीच्यावेळी पाण्याची पातळी वाढली होती.
देवगड समुद्रात वादळसदृश स्थिती, मच्छिमारी बंद : किनारपट्टीवर महाकाय लाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 15:28 IST
उपरच्या वाऱ्यानंतर दक्षिण वाऱ्यांचा जोर वाढल्याने समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाली असून किनारपट्टीला महाकाय उंच लाटा धडकत असल्यामुळे भरतीच्यावेळी पाण्याची पातळी वाढली होती. समुद्रात घाळाघाळ निर्माण झाल्यामुळे मच्छिमारी व्यवसाय बंद ठेवण्यात आला.
देवगड समुद्रात वादळसदृश स्थिती, मच्छिमारी बंद : किनारपट्टीवर महाकाय लाटा
ठळक मुद्देदेवगड समुद्रात वादळसदृश स्थिती, मच्छिमारी बंद किनारपट्टीवर महाकाय लाटा; पाण्याची पातळी वाढली