रहिम दलाल- रत्नागिरी-वर्षभरापूर्वीच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी २ कोटी रुपयांची आवश्यकता असून, दुरुस्तीचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीविना पडून आहे. हे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाला सादर केला होते.पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीची १७ गावांना झळ बसली होती. त्यामध्ये तालुकानिहाय गावे व वाड्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. दापोली- सुकोंडी बौध्दवाडी, जामगे देवाचा डोंगर, विश्रांतीनगर बौध्दवाडी, लाडघर श्राणेवाडी. चिपळूण- मुर्तवडे भटवाडी, सुतारवाडी, वारेली देऊळवाडी, वीर-बौध्दवाडी, रोहिदासवाडी, वीर प्राथमिक शाळा डुरा, येगाव, टेरव निमेवाडी, कळवंडे वरणेवाडी, कळंबट घवाळवाडी, वहाळ. गुहजागर- तवसाळ तांबटवाडी, नरवण धरणवाडी, पाचणेवाडी. संगमेश्वर- भडकंबा- पेठवाडी, बनेवाडी, देवळे तळेकरवाडी, धामापूर, आरवली सपाट भुवडवाडी, कोसुंब, कासे, असावे, माखजन, कुंभारवाडी, घोडवली, मुरादपूर, वांझोळे गावकरवाडी, कळंबुशी गायरवणे, खाचरवाडी. रत्नागिरी- पोमेंडी बुद्रुक, तरवळ मायंगडेवाडी, पावस - बौध्दवाडी. लांजा- निवसर मळा, बौध्दवाडी, शिरंबवली, नांदिवली मधलीवाडी, बागवेवाडी, आंजणारी मुस्लिमवाडी, निवसर. राजापूर- झर्ये, पेंडखळ खानविलकरवाडी, शेढे बावकरवाडी, कोदवली बौध्दवाडी, भालावली गुरववाडी, मूर चिखलेवाडी, देवाणे गोठणे राघववाडी, तुळसवडे माणिकचौकवाडी.या नैसर्गिक आपत्तीमध्ये ५६ पाणी पुरवठा योजनांची पडझड होऊन नादुरुस्त झाल्या होत्या. त्यामध्ये नळपाणी पुरवठा योजना, वैयक्तिक विहीरी, सार्वजनिक विहीरी, डुरा, गावतळी आदिंचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये १७ गावातील ५६ पाणी पुरवठा योजनांचे २ कोटी ६ लाख रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानामुळे अनेक ठिकाणच्या विहिरींची पडझड, पाणी पुरवठा योजन वाहून गेल्याने लोकांचे पाण्यासाठी हाल झाले होते. या नुकसानाचा अहवाल जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने शासनाला सादर केला आहे.त्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी केली आहे. मात्र, शासनाकडून अजूनही त्यावर काही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीमधील पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक रक्कम :तालुका दुरुस्तीसाठी आवश्यक रक्कमदापोली ३१ लाख चिपळूण३५ लाख ३५ हजारगुहागर१० लाखसंगमेश्वर५८ लाख ३५ हजाररत्नागिरी२२ लाखलांजा१३ लाख ५५ हजार राजापूर३५ लाख ७६ हजार एकूण २०६.०१ रुपयेटंचाईच्या कालावधीत गावांची संख्या वाढणारपाणीपुरवठा योजना नादुरुस्तीमुळे पाण्यासाठी हाल.नैसर्गिक आपत्तीमध्ये १७ गावातील ५६ पाणी पुरवठा योजनांचे २ कोटी ६ लाख रुपयांचे नुकसान.नुकसानीमुळे अनेक ठिकाणच्या विहिरींची पडझड, पाणी पुरवठा योजन वाहून गेल्याने लोकांचे पाण्यासाठी हाल.नुकसानीचा अहवाल पाणी पुरवठा विभागाकडून शासनाला सादर.
दुरुस्तीचे प्रस्ताव मंजुरीविना
By admin | Published: October 02, 2014 10:40 PM