शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

‘जैतापूर’चे काम पुढील वर्षापासून

By admin | Published: April 18, 2017 11:08 PM

फ्रान्स शिष्टमंडळाची माहिती : मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, प्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भातही जनजागृती करावी, तसेच या प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात यावीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी फ्रान्सच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळास सांगितले. २०१८ पासून प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल आणि २०२५ पर्यंत पहिला टप्पा कार्यरत होईल, अशी ग्वाही फ्रान्सचे विदेश मंत्री ख्रिश्चन मॅसे यांनी यावेळी दिली.जैतापूर प्रकल्पासंदर्भात आज ख्रिश्चन मॅसे यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मुंबईमध्ये वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक सूचना केल्या. ऊर्जा विभागाचे सचिव अरविंद सिंह, राजशिष्टाचार विभागाचे सचिव बाजीराव जाधव यावेळी उपस्थित होते. फ्रान्सच्या शिष्टमंडळात फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांडर झायग्लेर, एस. सिओरिटीना, एम. पेन, ई. मिलार्ड, एक्स उर्सेल, फिलिप पॉल, आदींचा समावेश होता.उद्योगांना आकर्षिक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने उत्तम धोरणे आखली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे भारतातील उद्योगांचे ‘पॉवर हब’ झाले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.जैतापूर प्रकल्पासंदर्भात लोकांमध्ये अनेक प्रश्न व साशंकता आहेत. ही साशंकता दूर करण्यासाठी स्थानिकांबरोबर सुसंवाद साधण्यात यावा. तसेच प्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भात काय उपाययोजना राबविणार आहात, याची माहिती स्थानिकांना द्यावी. याशिवाय या प्रकल्पातून निर्मिती होणाऱ्या विजेच्या दराबाबतही स्पष्टता असावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.मॅसे म्हणाले की, जैतापूर प्रकल्पात दहा हजार मेगावॅट वीज निर्मिती होणार असून, फ्रान्ससाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम येत्या २०१८ पासून सुरू करणार असून, २०२५ पर्यंत पहिला टप्पा सुरू होईल. तसेच जपानमधील अणुऊर्जा प्रकल्पात घडलेल्या घटनेचा अभ्यास करून जैतापूर प्रकल्पात अशा घटना होऊ नयेत, यासाठी विशेष सुरक्षा यंत्रणा बसविण्यात येणार आहे. तसेच मेक इन महाराष्ट्राच्या धर्तीवर हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनाचे साठ टक्के काम येथेच होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पात स्थानिक उद्योगांना सहभागी करून घेण्यासंदर्भात कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येईल. तसेच स्थानिक कंपन्यांनाही या प्रकल्पात सहभागी करून घेण्यात येणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचे दर हे परवडणारे असतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)स्थानिकांना प्रशिक्षण द्याजैतापूर प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातील कामाचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. प्रकल्प लवकर सुरू करण्यासाठी स्थानिकांना यामध्ये सहभागी करून घेणे आवश्यक आहे. या प्रकल्पात स्थानिकांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी त्यांना कौशल्य विकासासंदर्भातील प्रशिक्षण देण्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली.