शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पाईपलाईनचे काम बंद पाडले, जीवन प्राधिकरणचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 3:46 PM

बांदा : दोडामार्ग-सासोली ते वेंगुर्ला जाणाऱ्या जीवन प्राधिकरणच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम बुधवारी शेर्ले सरपंच उदय धुरी व ग्रामस्थांनी रोखले. ...

ठळक मुद्देपाईपलाईनचे काम बंद पाडले, जीवन प्राधिकरणचे कामशेर्ले ग्रामपंचायतीला कल्पना न देताच खोदाई

बांदा : दोडामार्ग-सासोली ते वेंगुर्ला जाणाऱ्या जीवन प्राधिकरणच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम बुधवारी शेर्ले सरपंच उदय धुरी व ग्रामस्थांनी रोखले. प्राधिकरण विभागाने स्थानिक ग्रामपंचायतीला कल्पना न देता रस्त्याची खोदाई केल्याचा आरोप धुरी यांनी केला.

यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता अमित कल्याणकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी जीवन प्राधिकरण विभागाने ५३ लाख रुपये बांधकाम खात्याकडे भरले नसल्याचे स्पष्ट झाले.गेले आठ दिवस शेर्ले येथे काम सुरू आहे.

यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीलादेखील कल्पना न देता रस्त्याची खोदाई करण्यात आली. त्यामुळे काम बंद करण्यात आले. यावेळी सरपंच उदय धुरी, शाम सावंत, विराज नेवगी, कामील माडतीस, आनंद चव्हाण, फासकू पावेल, इशद पावेल, अमोल धुरी आदी उपस्थित होते.काम बंदचा आदेशजोपर्यंत पैसे भरत नाहीत तोपर्यंत काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाईपलाईनच्या कामामध्ये ज्याठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्ते आहेत त्या रस्त्यांची तोडफोड होणार असल्याने बांधकाम खात्याकडे जीवन प्राधिकरणने १ कोटी ३० लाख रुपये भरण्याचा आदेश दिला होता.

त्यापैकी ७७ लाख रुपये प्राधिकरणने बांधकाम खात्याकडे भरणा केले. उर्वरित ५३ लाखांची भरणा केली नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले. त्यामुळे जोपर्यंत रक्कम वर्ग होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा आदेश अभियंता कल्याणकर यांनी दिला. 

टॅग्स :Waterपाणीsindhudurgसिंधुदुर्ग