कुडाळ : पणदूर तिठा येथे महामार्गाचे चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी तेथील दुकाने व घरांमध्ये शिरले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिक व व्यापाऱ्यांनी तब्बल दोन तास महामार्ग रोखून आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दरम्यान, जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महामार्गाची पाहणी करून महामार्गासंबंधी असलेल्या सर्व समस्या सोडविण्याचे आदेश दिले.कुडाळ तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारीही पावसाला जोर होता. पणदूर तिठा येथे महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मात्र, चौपदरीकरणावेळी येथील पाणी वाहून नेण्यासाठी नव्याने घालण्यात आलेल्या मोरीतून हे पाणी जात नसल्याने तेथे पाणी साचू लागले. हे साचलेले पाणी महामार्गाच्या जवळच असलेल्या दुकाने आणि घरांमध्ये शिरण्यास सुरुवात झाली.त्यामुळे संतप्त झालेले नागरिक आणि व्यापाऱ्यांनी दिलीप बिल्डकॉनने केलेल्या चुकीच्या कामाविरोधात शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास महामार्ग रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प होऊन त्याचा फटका वाहनचालक आणि प्रवाशांना बसला. दरम्यान, दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येत पाण्याची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली.महामार्गाची दुर्दशादोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यात ठिकठिकाणी महामार्गाची दुर्दशा झाली आहे. पणदूर तिठा ते ओरोस दरम्यानचा व पावशी बेलनदी येथील रस्ता खचला असून काही ठिकाणची माती वाहून गेल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दरम्यान, पालकमंत्री केसरकर यांनी कुडाळ तालुक्यातील महामार्गाची पाहणी करीत येत्या काही दिवसांत महामार्गासंबंधी निर्माण झालेल्या सर्व समस्या सोडविण्याचे आदेश संबंधितांना दिल्याची माहिती मिळत आहे.
पणदूर तिठा येथे चुकीच्या पद्धतीने काम; महामार्गावरील वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 1:30 PM
कुडाळ : पणदूर तिठा येथे महामार्गाचे चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी तेथील दुकाने व घरांमध्ये ...
ठळक मुद्दे पणदूर तिठा येथे चुकीच्या पद्धतीने काम; महामार्गावरील वाहतूक ठप्पनागरिक, व्यापाऱ्यांनी महामार्ग धरला रोखून