शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
5
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
6
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
7
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
8
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
9
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
10
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
11
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
12
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
13
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
14
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
15
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
16
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
17
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
18
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
19
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"

खोट्या आश्वासनांची वर्षपूर्ती

By admin | Published: November 05, 2015 11:02 PM

नीतेश राणेंचा पालकमंत्र्यांवर हल्लाबोल : जिल्हा विकासाच्या चर्चेबाबत एका व्यासपिठावर येण्याचे आव्हान

कणकवली : पालकमंत्री दीपक केसरकर हे घोषणाबाज आहेत. त्यांनी या जिल्ह्यात जवळपास ५00 कोटी हून जास्त निधी आणला असल्याची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात प्रशासनाकडून आलेल्या निधीबाबतची माहिती घेतल्यावर प्रत्यक्षात १९४ कोटींचा निधी प्रत्यक्षात आला आहे. त्यातील १२५ कोटी हे जिल्हा नियोजन विकास आराखड्यातील असून ते यातून वजा केल्यास आलेल्या निधीची वस्तुस्थिती समोर येते. केसरकर हे खोटारडे असून केवळ वर्तमानपत्रांमध्ये छापण्यासाठी कोटींचे आकडे बोलतात. जिल्हा विकासासंबंधी खुल्या व्यासपिठावर लोकांसमोर कार्यक्रम आयोजित करा. असे आव्हान त्यांना मी देतो. मग खरी वस्तुस्थिती लोकांसमोर येईल. असे आव्हान काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिले.नीतेश राणे म्हणाले, ३१ आॅक्टोबरला या सरकारला वर्ष झाले. त्यामुळे गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील खुंटलेल्या विकासाबाबतची वस्तुस्थिती आणि पालकमंत्र्यांनी जाहीर केलेल्या खोट्या आकडेवारीचे मी तुमच्या समोर आज वस्त्रहरण करणार आहे. पालकमंत्री केसरकर यांनी आपण ५00 कोटी हून जास्त निधी आपण आणला असल्याची आकडेवारी छापली आहे. प्रत्यक्षात मात्र, यापैकी ५0 टक्के निधीदेखील अद्याप आलेला नाही. केवळ जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १२५ कोटींचा निधी आला आहे. डोंगरी विकास, कोकण ग्रामीण पर्यटन विकास, तिलारी प्रकल्प, नगरपालिकांसाठी विशेष अनुदान, दलित वस्ती सुधारणा, प्रादेशिक पर्यटन, ग्रामपंचायत अनुदान, पर्यटन विकास, चिपी गोवा रस्ता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाबार्ड, सावंतवाडी टर्मिनस हत्ती बंदोबस्त याबाबत पालकमंत्र्यांनी जाहीर केलेला निधी आणि प्रत्यक्षातील निधीत मोठी तफावत आहे. त्यामुळे याबाबतची पोलखोल आपण यापुढे करणार आहे, असे नीतेश राणे यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)सी वर्ल्ड रद्द झाला का? : राणेंचा जठारांना सवालमालवण तोंडवळी येथील प्रस्तावित सी वर्ल्ड प्रकल्पासाठी पर्यायी जागा आपण मुख्यमंत्र्यांना सुचविली असल्याचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याचा अर्थ तोंडवळी येथील सी वर्ल्ड प्रकल्प रद्द झाला आहे असा होतो. सी वर्ल्ड रद्द झाल्याचे अप्रत्यक्ष त्यांनी जाहीरच केले. प्रमोद जठार यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, सागरी महामार्ग चौपदरीकरणासाठीचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठविला आहे. मग आताच्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काय झाले? डिसेंबर २0१४ पासून कामाला सुरूवात होणार होती. युतीतील नेतेमंडळी काही महिन्यांपूर्वी पुलांच्या कामाच्या उद्घाटनाला एकापुढे एक धावत होती. विजयदुर्ग येथे स्मार्टसिटी उभारणार असे म्हणणे म्हणजे जठारांचे अज्ञान आहे. आधी विजयदुर्गला नगरपंचायत करा आणि मग सिटी उभारण्याचे बोला.मुंबईतील काही प्रकल्प सिंधुुदुर्गात आणणार असे जठार म्हणत होते. म्हणजे मुंबईचे महत्व कमी करण्याचा भाजपाचा डाव असल्याचे त्यांनी दिलेल्या माहितीतूनच स्पष्ट होत आहे.आमदार आदर्श योजनेबाबत आपल्याला शासनाकडून पत्रव्यवहार झाला आहे. प्रत्येक आमदाराने मतदार संघातील तीन गावे निवडायची आहेत.मात्र, या निवडलेल्या सर्व गावांसाठीचा निधी आपल्या आमदार निधीतून खर्च करायचा आहे किंवा स्वत: पदरमोड करून करायचा आहे. असे असेल तर मग निधी आम्ही खर्च करायचा आणि याचे श्रेय शासनाला का? असा प्रश्नही यानिमित्ताने नीतेश राणे यांनी उपस्थित केला.पालकमंत्र्यांवर हक्कभंग प्रस्ताव आणणारपालकमंत्री दीपक केसरकर यांनी खोटी माहिती देऊन येथील जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे.विधीमंडळात याबाबत आवाज उठवून त्यांना माहिती देण्यास भाग पाडणार असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी सांगितले.जर मी खोटी माहिती देत असेन तर माझ्यावर त्यांनी अबु्रनुकसानीचा दावा दाखल करावा, असे आव्हान त्यांनी केसरकर यांना दिले.जिल्हा विकासाच्या आड येणाऱ्यांची गय नाहीपुढील वर्षातही आपण या जिल्ह्यात सक्षम विरोधक म्हणून काम करणार आहे. जिल्हा विकासाच्या आड येणाऱ्यांविरोधात आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.येथील शेतकऱ्यांच्या भात प्रश्नासाठी आपण ज्याप्रमाणे रस्त्यावर उतरलो. उद्या देवगड येथे पाणीप्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच पुढील वर्षात आक्रमक राहू.जिल्ह्यातील मच्छिमारांच्या प्रश्नावरही आपण आवाज उठवू असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याचा विकास ठप्प झाला आहे. याबाबत प्रत्येकाने गांभिर्याने लक्ष देणे आवश्यक असून सत्ताधाऱ्यांना याबाबत वेळोवेळी जाब विचारणे आवश्यक बनले आहे.