सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वळीव पावसाची हजेरी दिवसभरात अधूनमधून सुरू आहे. प्रादेशिक हवामान विभाग मुंबईकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात दि. २०, २१ व २२ मे २०२४ रोजी यलो अलर्ट, दि. २३ व २४ मे रोजी ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच दि. २० ते २३ मे या कालावधीत जिल्ह्यात गडगडाट होऊन पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे.दि.२० मे ते २२ मे या कालावधीत ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याने या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्गमार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्यात २० ते २२ मे या कालावधीत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून २० मे रोजी ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने, तर २१ आणि २२ मे रोजी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात पावसाची रिपरिपसोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तर प्रत्यक्षात दुपारनंतर वादळी पावसाने सुरुवात केली होती. कणकवलीसह सह्याद्री पट्ट्यात जोरदार पावसाच्या सरी बरसत होत्या. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सायंकाळच्या सत्रात बरसरणारा पाऊस सोमवारपासून दुपारच्या सत्रातच हजेरी लावू लागला आहे.