रत्नागिरी : मध्यप्रदेशमधील उज्जैन येथे महर्षी सांदीपनी वेदविद्या प्रतिष्ठानमध्ये विराट गुरुकुल संमेलन पार पडले. या संमेलनात रत्नागिरीच्या अॅड. बाबासाहेब नानल गुरूकुलचे विद्यार्थी सहभागी झाले होते.गुरुकुलमध्ये योगानुकुल शिक्षण पद्धतीवर भर देण्याकरिता या संमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी देशभरातील १२०० गुरुकुल प्रतिनिधी उपस्थित होते. या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते.
यावेळी अॅड. नानल गुरुकुलच्या २० विद्यार्थ्यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके सादर केली. या विद्यार्थ्यांना गुरुकुलप्रमुख राजेश आयरे व अनुप्रिता पाध्ये यांनी मार्गदर्शन केले.रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, गुरुकुल व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश लोवलेकर, शिर्के हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.