शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
12
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
13
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
14
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
16
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
17
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
18
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
19
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
20
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या

संसाराचा डोलारा सांभाळत बारावीत पटकाविला प्रथम क्रमांक, नाटळ चव्हाणवाडी येथील महिलेचा आदर्श

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 25, 2024 2:14 PM

मिलिंद डोंगरे कनेडी ( सिंधुदुर्ग ) : शिक्षणाला वयाची मर्यादा नसते ते शेवटच्या क्षणापर्यंत घेऊ शकतो. काहींना शिक्षणाची एवढी ...

मिलिंद डोंगरेकनेडी (सिंधुदुर्ग) : शिक्षणाला वयाची मर्यादा नसते ते शेवटच्या क्षणापर्यंत घेऊ शकतो. काहींना शिक्षणाची एवढी ओढ असते की ती कुठल्याही परिस्थितीत मिळविण्यासाठी धडपडत असतात आणि आपल्या आकांशा पूर्णही करतात. आपल्याकडे जिद्द, महत्वाकांक्षा, इच्छाशक्ती, आत्मविश्वास असेल तर कुठली ही गोष्ट कठीण नसते. हा आत्मविश्वास श्री मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कनेडीच्या योगिता चव्हाण यांनी खरा करून दाखविला आहे. बारावीच्या बोर्ड परीक्षेत कला शाखेत ७४.५० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांकावर त्यांनी आपली मोहर उठविली आहे. त्यांचे हे यश निश्चितच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.योगिता यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण रामगड येथील प्रगत विद्यामंदिर रामगड येथे झाले. त्यांचे आईवडील शेतकरी होते. भावंडांमध्ये त्यामोठ्या होत्या. गरीब परिस्थिती मुळे त्यांना दहावीनंतर पुढील शिक्षणावर पाणी सोडावे लागले. लहानपणा पासूनच हुशार असलेल्या कुबल यांनी जिद्दीच्या व मेहनतीच्या जोरावर दहावीत ७४ टक्के मिळवत रामगड हायस्कूलचे नाव उज्वव केले होते. मागे तीन बहिणी आणि वडिलांची परिस्थिती गरिबीची असल्याने त्यांना शिक्षणाची ओढ असून सुद्धा शिक्षणाचा प्रवास तेथेच थांबवावा लागला.

नंतर २००८ मध्ये त्यांचे नाटळ येथील एकनाथ चव्हाण यांच्याशी शुभमंगल झाले. लग्न झाल्यानंतर मुले ,संसारात शिक्षणाची आवड असतानाही शिकता आले नाही. परंतु त्या याही कालावधीत गप्प बसल्या नाहीत .हरहुन्नरी असलेल्या योगिता या स्वतः पावरट्रेलर चालवत आपल्या पतीसोबत शेतीच्या कामात अग्रेसर असायच्या. एव्हाना मुले साधारण मोठी झाली होती. मोठा मुलगा निखिल ८ वी व लहान मुलगा साईराज हा सातवित शिकत होता.

संसाराच्या व्यापामुळे काहीवेळा दांडीआपल्या पुढील शिक्षणाला पोषक वातावरण बघून योगिता यांनी याबात आपल्या पती एकनाथ यांना विचारले, त्यांचा आणि मुलांचा कौल मिळताच त्यांनी कनेडी कॉलेजमध्ये आपले नाव दाखल केले.बघता बघता अकरावी संपून बारावीत प्रवेश झाला. संसाराच्या व्यापामुळे काही वेळा कॉलेजला दांडी मारावी लागत होती .परंतु मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यशामध्ये पतीसमवेत मुलांचाही वाटाबारावीच्या परीक्षेत रात्र रात्र जागून अभ्यास केला त्याचे फळ त्यांना मिळाले. कनेडी कॉलेज च्या कला शाखेतून प्रथम येण्याचा मान त्यांनी पटकावला. या यशात त्यांच्या पती राजांबरोबरोबरच मुलांनीही खारीचा वाटा उचलत सहकार्य केले. त्यामुळेच आपण यशाला गवसणी घालू शकले असल्याचे त्या म्हणाल्या .

प्रेरणादायी यशकणकवली तालुक्यातील नाटळ चव्हाण वाडी येथील योगिता चव्हाण यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे कारण प्रतिकूल परिस्थितीत ही त्यांनी आपली जिद्द ,आत्मविश्वास ,प्रयत्न, इच्छाशक्ती डळमळू न देता यशाला गवसणी घातली. त्यांचे हे यश नेहमीच विद्यार्थ्यांना आदर्शवत व प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही.

नर्सिंग क्षेत्र निवडणारबारावी नंतर आपण नर्सिंग क्षेत्र निवडणार आहे. मला त्या क्षेत्रात आवड असल्याने आपण त्यातच करीयर करून रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्यरत रहाणार असल्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHSC Exam Resultबारावी निकाल