सिंधुदुर्गनगरी : देवगड हापूस आंबा बागायतदार शेतकरी, व्यापारी यांच्यावर आंबा विक्रीचे आलेले संकट दूर करून जीवनावश्यक वस्तूमध्ये हापूस आंब्याचा समावेश करावा आणि वाशी मार्केट येथे आंबा विक्रीस नेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन देवगड हापूस आंबा बागायतदार यांनी पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यासाठी सुपूर्द केले. निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर उपस्थित होते.आंबा बागायतदार यांच्यावरील आलेले संकट दूर करावे या मागणीसाठी सोमवारी पालकमंत्री उदय सामंत यांची बागायतदार यांनी भेट घेतली.या निवेदनावर जयेश नर, विष्णू घाडी, फरीद काझी, शकील मुल्ला, दिनेश तेली, दिलीप गुरव, नंदकुमार गुरव, चंद्रकांत गुरव, हरिश्चंद्र गोडे, अनिल गोडे, अंकुश माळकर, रवींद्र माळकर, दत्ताराम घाडी, संतोष घाडी, पांडुरंग गोठणकर, राजेंद्र परब यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा बिमोड करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले.आंब्याचे पीक चांगले यावे यासाठी वर्षभर मेहनत घेत आहोत. या पिकावर कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण हा खर्च अवलंबून आहे. त्यामुळे गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हापूस आंबा वाशी मार्केटमध्ये नेण्यास परवानगी मिळावी तसेच होणाऱ्या आमच्या नुकसानीचाही विचार करून आंबा मार्केटमध्ये नेण्यास परवानगी द्यावी व आंबा बागायतदार यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
वाशी मार्केटात आंबा विक्रीस नेण्याची परवानगी मिळावी, मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 4:20 PM
वाशी मार्केट येथे आंबा विक्रीस नेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन देवगड हापूस आंबा बागायतदार यांनी पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यासाठी सुपूर्द केले.
ठळक मुद्देवाशी मार्केटात आंबा विक्रीस नेण्याची परवानगी मिळावीदेवगड हापूस बागायतदार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन सादर