शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

ेवगड येथील युवकाचा शिवगंगा नदीत बुडून मृत्यू

By admin | Published: March 05, 2017 11:14 PM

पाडागर-सैतवडे येथील घटना : पोहणे जिवावर बेतले

शिरगाव : पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या देवगड तालुक्यातील शिरगाव पाडागरवाडी येथील सैतवडे धबधब्यापासून सुमारे ८० ते ९० मीटर अंतरावर असलेल्या पियाळी-शिवगंगा नदीपात्रात देवगड येथून मौजमजेसाठी आलेल्या सात मित्रांपैकी आशिष अल्हाद कुलकर्णी (वय ३२, रा. देवगड सातपायरी) या युवकाचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, देवगड सातपायरी येथील आशिष कुलकर्णी याच्या मालकीची (एमएच ०७, क्यू ७५२२) गाडी भाड्याने घेऊन वीरेंद्र जाधव (रा. वाडा मूळबांध), मिलिंद माने (रा. देवगड जगतापवाडी), प्रकाश कोयंडे (रा. मोंड), संतोष घारे (रा. इळये-पाटथर), प्रमोद चव्हाण (रा. कुणकेश्वर), संतोष पवार (रा. इळये-असरोंडी) हे सातजण पाडागर-सैतवडे धबधब्यानजीक मौजमजा करण्यासाठी दुपारी एक वाजता आले होते. सैतवडे धबधबा ज्या पियाळी-शिवगंगा नदीतून वाहतो त्या नदीपात्राजवळ या सात मित्रांनी जेवण शिजविले. त्यातील काहीजण हे धबधब्यापासून ८० ते ९० मीटर अंतरावर असलेल्या कोंडीत पोहण्याचा आनंद लुटत असताना आशिष याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने नदीत बुडाला. याबाबत वीरेंद्र जाधव याने पोलिसांत माहिती दिली.शिरगाव पाडागर सैतवडे धबधब्यापासून शिवगंगा नदीचे संपूर्ण पात्र काळीथर दगडाचे आहे. या नदीपात्रात धबधब्यापासून वाहत आलेल्या पाण्याचा गोल भोवरा तयार होतो. नदीपात्रात काळीथर कडेकपारी, भुयारी मार्ग आहेत. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बुडालेल्या आशिष कुलकर्णी याचा मृतदेह तब्बल तीन तासांनी सायंकाळी ६.१२ वाजता हुमरठ येथील कृष्णा होळकर व तात्या होळकर या घोरपी समाजबांधवांनी खोल पाण्यात उतरून बाहेर काढला.याबाबतची घटना समजताच शिरगाव येथील विविध सामाजिक संस्थांचे, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनीही मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. देवगड पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक डी. एस. वाळवेकर, शिरगाव पोलिस दूरक्षेत्राचे अंमलदार विजय कांबळी, पराग मोहिते, प्रशांत जाधव, नितीन शेट्ये, दादा परब यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी देवगड पंचायत समितीचे सभापती रवींद्र जोगल, पंचायत समिती सदस्य सदानंद देसाई, संतोष किंजवडेकर, माजी सरपंच अमित साटम, शशिकांत गोठणकर, भाई आईर, राजेंद्र तावडे, पोलिस पाटील चंद्रशेखर साटम, मिलिंद साटम, संदीप साटम, राजेंद्र शेटये, मंगेश लोके, मंगेश धोपटे, संतोष फाटक, आदी उपस्थित होते.आशिष कुलकर्णी याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच देवगड येथील ग्रामस्थ, विविध स्तरातील पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे घटनास्थळाचे वातावरण शोकाकुल झाले होते. (प्रतिनिधी)नदीपात्रातील पाण्याचा अंदाज येत नाहीशिरगाव-पाडागर सैतवडे धबधब्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे व बारमाही हा धबधबा वाहत असल्याने दररोज पर्यटक येथे मौजमजा करण्यासाठी येत असतात. मुळातच या धबधब्याच्या नदीपात्रातील रचना ही कडेकपारी काळीथर दगडाची आहे. यात पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. शिवाय वाहत्या पाण्याला वेग असल्याने पाण्याचा भोवरा तयार होतो. शिवगंगा नदीवरील फोंडा-घोणसरी धरणातून पाणी सोडले जात असल्याने पाण्याच्या पातळीचा अंदाज येत नाही. येथे यापूर्वीही बुडून