बांदा : सावंतवाडी तालुक्यातील डेगवे-आंबेखणवाडी येथील सोनू हिरबा देसाई (वय ४०) याचा माकडतापाने शनिवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. गेले चार-पाच दिवस त्याला ताप येत होता. त्यानंतर तळकट प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्यावर उपचार सुरू होते. माकडतापाचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्याला तातडीने बांबोळी-मेडिकल कॉलेज येथे हलविले. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. सोनू देसाई हा युवक कळणे येथील मायनिंग प्रकल्पावर कामाला होता. गेले आठ-दहा दिवस त्याला ताप येत होता. २ जून रोजी तपासणीसाठी तळकट प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर बांदा येथेही खासगी डॉक्टरांकडे तपासण्या झाल्या. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यानंतर सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, रक्ताच्या तपासणीचा अहवाल तळकट प्राथमिक आरोग्य केंद्राला ५ जून रोजी प्राप्त झाला. डेगवेत दुपारी सोनूवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. आरोग्य विभागात खळबळ या अहवालात माकडतापाचे निदान करण्यात आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. माकडतापाचा पॉझिटिव्ह अहवाल आल्याने सोनू देसाई याला बांबोळी-गोवा येथे हलविण्यात आले. गेले चार दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
युवकाचा माकडतापाने मृत्यू
By admin | Published: June 12, 2016 12:46 AM