सावंतवाडी : मी जातोय मला सभाळून घे असा मोबाईल संदेश मित्राला पाठवत सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे येथील साहिल सुनिल राऊळ (22) या युवकाने माजगाव येथील मित्रांच्या भाड्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.या घटनेने शिरशिंगे गावात एकच खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण मात्र अद्याप पर्यत स्पष्ट होऊ शकले नाही.
शिरशिंगे वीरवाडी येथील साहिल राऊळ हा आयटीआय झाला होता.त्याने आलिकडेच माजगाव येथील कंपनीत काम शोधले होते.त्या कामावर मागील काहि दिवसापासून येत होता. सकाळच्या सत्रात कंपनीत तर सायंकाळी सावंतवाडी शहरातील एका हाॅटेल मध्ये तो काम करत होता.आणि माजगाव येथे आपल्या मित्राच्या घरी राहत होता.
सोमवार असल्याने माजगाव येथील कंपनी ला सुट्टी असते त्यामुळे तो एरव्ही आपल्या शिरशिंगे या आपल्या गावी जातो पण आज गावी न जाता खोलीवरच थांबला सकाळी आंघोळ केली नंतर बाजारात ही जाऊन आला त्यानंतर दुपारच्या सत्रात त्याने अचानक आपल्या मित्राला मोबाईल वर संदेश पाठवला यात मला जमत नाही सभाळून घे मला स्टेशन आले असे लिहून मोबाईल स्वीच ऑफ केला.या मोबाईल संदेशा नंतर लागलीच त्याचे मित्र माजगाव येथील खोलीवर गेले तर दरवाजा बाहेरून बंद होता तसेच साहिल आतून आवाज देत नव्हता.
त्यामुळे पोलिसांना बोलविण्यात आले व दरवाजा उघडण्यात आला पण तत्पूर्वीच साहिल याने गळफास घेत आपले जीवन संपवले होते.या घटनेनंतर त्याच्या मित्राना अश्रू अनावर झाले या घटनेची माहिती पोलिसांनी त्याच्या कुटूंबाला दिली त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला तसेच मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच शिरशिंगे गावातील अनेक ग्रामस्थ रूग्णालयात परिसरात दाखल झाले.त्यानंतर उशिरा मृतदेह शिरशिंगे गावी नेण्यात आला या घटनेचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहे.मृत साहिल याच्या मागे आई वडील बहीण असा परिवार आहे.शिरशिंगे चे माजी सरपंच नारायण राऊळ यांचा तो पुतण्या होता.