आपल्या देशात टॅलेंटला कमी नाही, कधी कोण काय करेल सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील व्हायरल झालाय. या व्हिडीओत जमिनीखाली ११ खोल्यांचे घर बनवल्याचे दिसत आहे. एका व्यक्तीने स्वतः जमिनीखाली २ मजली घर बनवले आहे. हे उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील आहे. एका व्यक्तीने जमिनीत दोन मजली घर तयार केले आहे. या व्यक्तीने स्वतःच्या हाताने मातीत हे घर बनवले आहे. ११ खोल्यांचे हे घर बांधण्यासाठी त्या व्यक्तीला १२ वर्षे लागली. या घरात जिने, बाल्कनी, खिडकी आणि मातीचे सोफा टेबल असलेल्या ११ खोल्या आहेत.
अरे व्वा! खेळता खेळता चिमुकल्याला सापडली 1800 वर्षे जुनी अनोखी गोष्ट; नेमकं काय घडलं?
या घराच्या व्हायरल व्हिडीओमध्ये हे घर शेतात बांधलेले दिसत आहे. या घरापर्यंत खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवर बसण्यासाठी जागा आणि खुर्चीही आहे. एका बाजूला खिडकी आणि बाल्कनीही आहे. खाली असलेल्या या घरात एक व्यक्ती मातीच्या सोफ्यावर बसलेली दिसते. त्याच सोफ्याजवळ मातीचे एक गोल टेबल देखील आहे ज्यावर वस्तू ठेवल्या आहेत. ओसाड जमिनीवर घर बांधले आहे.
व्हिडीओमध्ये निवडणुकीशी संबंधित काही पोस्टर्सही घरात दिसत आहेत. घर बांधणाऱ्या व्यक्तीने निवडणूक लढवली असल्याची माहिती मिळाली. मात्र, ते निवडणूक हरले आणि त्यानंतर ते घर सोडून या ओसाड जमिनीवर राहायला आले आणि त्यांनी या ठिकाणी हे अनोखे घर बांधले. घरात गेल्यावरही हवा आणि सूर्यप्रकाश येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.त्यासाठी घरात खिडक्या आणि स्कायलाइट्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे.