लोकांना प्राणी पाळणे आवडते. काही प्राणी हे अतिशय गोड असतात. तर काही प्राण्यांच्या हल्ल्यामुळे आपल्या जीवितास धोका निर्माण होतो. काही मुके प्राणी मोठ्या संकटात सापडतात. त्यांना रेस्क्यू करण्यासाठी नंतर वनविभागाला मेहनत घ्यवी लागते. सध्या एका विषारी किंग कोब्राची सुटका करण्यात आली आहे. ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात कोब्रा विहिरीत पडलेला होता. त्याला वाचवण्यासाठी वनविभागाने जिवाची बाजी लावली आहे. हा साप १२ फूट लांब असल्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जास्त कष्ट सोसावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील खुंटा भागात किंग कोब्रा अडकल्याची माहिती वन विभागाच्या टीमला मिळाली होती. यानंतर कसलाही उशीर न करता वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. तब्बल बारा फुटांचा कोब्रा नाग विहिरीत पडल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली होती. या पथकाने परिसराची माहिती घेतली. कोब्रा जगातील सर्वात विषारी सर्वात विषारी साप म्हणून ओळखला जाते. विहिरीत पडलेला हा साप बारा फूट लांब असल्यामुळे नवनिवभागाला त्याला रेस्क्यू करण्यासाठी विशेष योजना आखावी लागली.
दरम्यान, वन विभागाच्या अथक प्रयत्नानंतर किंग कोब्राला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. एवढा मोठा साप पाहून येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरले होते. तसेच वनविभागाच्या पथकाने जीव धोक्यात घालून कोब्राला रेस्क्यू केले. रेस्क्यू पथकाने सापाला नंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.