आपल्या मुलांना थोडी दुखापत झाली तरी आपण काळजी करत बसतो. मात्र, तुम्हाला हे समजून घेण्याची गरज आहे की लहान मुलं इतकी नाजूक नसतात. हे आज आम्ही तुम्हाला यासाठी सांगत आहोत, कारण एका १२ वर्षीय चिमुकलीने चक्क आपल्या हाताने झाडावर बुक्की मारत भलंमोठं झाडं पाडलं आहे (Girl Punching Down a Tree Using her Boxing Skills). या मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे.
इंटरनेटवर सर्वात स्ट्राँग गर्ल (Strongest Girl) म्हणून प्रसिद्ध झालेल्या इव्हनिका सद्वकासची बॉक्सिंग खरोखरच थक्क करणारी आहे. ती इतकी ताकदवान आहे की अगदी मोठमोठ्यांनाही काही मिनिटांत धूळ चारू शकते. रशियातील या मुलीचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती झाडावर बुक्क्यांनी मारताना दिसत आहे.
इव्हनिका ही मूळची रशियाची असून ती लहानपणापासून बॉक्सिंगचा सराव करत आहे. तिचे वडील रुस्ट्रम हे स्वतः बॉक्सिंग प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्या प्रशिक्षणात इव्हनिका इतकी कुशल बॉक्सर बनली आहे की तिच्यासमोर एक झाडही टिकू शकत नाही. व्हिडिओमध्ये ही मुलगी झाडाला बुक्क्यांनी मारताना दिसते. वेग आणि ताकदीने तिने आधी झाडाला बुक्क्या मारून कमकुवत केले आणि नंतर हळूहळू झाड कोसळले. हा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
इव्हनिकाचे वडील रुस्ट्रम यांच्याशिवाय तिच्या ७ भावंडांनाही बॉक्सिंगची तितकीच आवड आहे. मुलांची आई आनियादेखील एक अव्वल क्रीडापटू होती, परंतु ती एक जिम्नॅस्ट होती. एका मिनिटात ६५ पंच मारण्याचा विश्वविक्रमही १२ वर्षीय इव्हनिकाच्या नावावर आहे. ती आपल्या शक्तिशाली ठोसेने दरवाजे आणि सर्व मजबूत वस्तू तोडण्यात माहिर आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून ती तिच्या कौशल्यावर काम करत आहे. मुलीची आवड पाहून वडिलांनीही तिला बॉक्सिंगसाठी तयार करण्यास सुरुवात केली आणि त्याचा परिणाम आता सर्वांसमोर आहे.