PUBG खेळता-खेळता 'तो' जोरात ओरडला, शरीर लाल पडलं आणि प्राण सोडला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 12:28 PM2019-05-31T12:28:50+5:302019-05-31T12:31:03+5:30

गेल्या काही महिन्यांपासून PUBG या गेमवरून चांगलंच वादळ उठलं आहे. पण हा गेम खेळणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाहीये.

16 years Child death while playing PUGB game in Madhya Pradesh news goes viral | PUBG खेळता-खेळता 'तो' जोरात ओरडला, शरीर लाल पडलं आणि प्राण सोडला!

PUBG खेळता-खेळता 'तो' जोरात ओरडला, शरीर लाल पडलं आणि प्राण सोडला!

googlenewsNext

गेल्या काही महिन्यांपासून PUBG या गेमवरून चांगलंच वादळ उठलं आहे. पण हा गेम खेळणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाहीये. तरूणांनामध्ये या गेमची मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. या गेममुळे अनेकांना काय काय नुकसान झालं हेही वेळोवेळी समोर आलं आहे. आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

मध्यप्रदेशच्या नीमच जिल्ह्यातील ही घटना असून इथे एक मुलगा PUBG गेम खेळत होता. गेम खेळता खेळता त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला.या मुलाचं नाव फुरकान कुरेशी होतं. नीमच जिल्ह्यातील पटेल प्लाझामध्ये तो राहत होता. त्याच्या घरच्यांनी सांगितले की, मुलाला हा गेम खेळण्याची सवय लागली होती. मृत्यूआधीही तो तब्बल ६ तास PUBG गेम खेळत होता.

(Image Credit : TNW)

ज्यावेळी फुरकानचा मृत्यू झाला त्यावेळी त्याची लहान बहीण फिजा त्याच्याजवळ होती. तिने सांगितले की, गेममध्ये त्याचा एक साथीदार खेळाडू ब्लास्टमध्ये मारला गेला. फुरकान यामुळे काही मिनिटे जोरात ओरडू लागला होता. त्यानंतर त्याने कानातून हेडफोन काढले आणि एकाएकी त्याचा मृत्यू झाला. त्याचं संपूर्ण शरीर लाल झालं होतं. त्याला लगेच डॉक्टरांकडे नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

फुरकानच्या वडिलांनी सांगितले की, 'मी कामासाठी बाहेरगावी राहतो. फुरकान केंद्रीय विद्यालयात १२वी चा विद्यार्थी होता. माझ्या भावाच्या मुलीच्या लग्नासाठी घरी पाहुणे येणार होते. घरात आनंदाचं वातावरण होतं. फुरकान गेल्या दीड वर्षांपासून PUBG खेळत होता. तो सतत हा गेम खेळत होता. अनेकदा त्याला आम्ही रोखलं, पण त्याने कधी ऐकलं नाही'.

फिजाने सांगितलं की, 'त्याने हेडफोन काढले आणि तेव्हाच जीव सोडला. तो आजारीही नव्हता. तो हा गेम खेळल्याशिवाय राहू शकत नव्हता. दिवसरात्र तो हा गेम खेळत राहत होता. जेव्हा गेम डिलीट करण्याचं कुणी बोलत होतं, तेव्हा तो जेवण करत नव्हता'.

Web Title: 16 years Child death while playing PUGB game in Madhya Pradesh news goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.