सामान्यपणे घरातील एका रूममध्ये किती पॉवर पॉइंट्स असतात? एका किंवा दोन असं साधारण उत्तर सगळे देतील. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, असा प्रश्न आम्ही का विचारतोय? झालं असं की, यूकेतील मिडलसेक्समध्ये एक घर विक्री आहे. ५ बेडरूमचं हे घर चांगलंच मोठं आहे. या घराची किंमत आहे १७.५ कोटी रूपये. पण जे कुणी हे घर बघायला जातात, ते घरातील विचित्र नजारा पाहून हैराण होतात.
ट्विटरवर Toby Davie ने एक लिंक शेअर केली आहे. ज्यात या प्रॉपर्टीबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याने ही लिंक शेअर करताना कॅप्शन लिहिले की, 'मी हे घर विकत घेण्याचा विचार करतोय, पण हे ठरवू शकत नाहीये की हे प्लग सॉकेट्स मला पुरतील की नाही'.या लिंकवर प्रॉपर्टीचे सगळे डिटेल्स दिले आहेत. यात लिहिले आहे की, 'या घरात राहणारं कुटूंब दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालं आहे.
ट्विटवर फोटो समोर येताच प्रत्येकाची नजर यातील प्लग सॉकेट्सवर गेली. एका यूजरने लिहिले की, 'असं वाटतं की, इथे इलेक्ट्रिशिअनचं ट्रेनिंग सेंटर असेल?' तर एकाने लिहिले की, 'समोरच्या रूममध्ये सीआयएचं ऑफिस होतं का?'.
मजेदार बाब ही आहे की, या घराच्या भिंतींवर केवळ जास्त प्लग पॉइंट्स आहेत असं नाही तर कोणतही सॉकेट एकमेकांच्या समांतर नाही. कुठेही कसेही लावले आहेत. त्यामुळे लोकांना हे लक्षात येत नाहीये की, या घरातील लोक इतक्या सॉकेटचं करत काय होते. तुमच्या लक्षात आलं तर सांगा बरं का....